आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीने 'पाॅप्युलर'ची बॅंक खाती गोठवली:देशभरातील कारवाईविरोधात जळगावमध्ये निदर्शने; केंद्रावर दबावाचा आरोप

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरातील खाती गोठवत ईडीने पाॅप्युलर फ्रंट या संघटनेवर कारवाई केली. याविराेधात संघटनेतर्फे शुक्रवारी (ता. 3) जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने करण्यात आली.

ईडीने पाॅप्युलर संघटनेची देशभरातील सर्व ब‌ँक खाती अनिश्चित काळासाठी गाेठविली आहेत. याचा निषेध निदर्शनावेळी करण्यात आला. गेल्या काही वर्षात संघटनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केंद्र शासनाकडून केला जात आहे. त्याचाच हा एक भाग असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

ईडीने पाॅप्युलर फ्रंटच्या बॅंक खात्याची मागील 13 वर्षांची तपासणी केली आहे. यात टार्गेट करणे हा हेतू असल्याचा आराेप संघटनेतर्फे करण्यात आला आहे.

पाॅप्युलर फ्रंट लाेकशाहीच्या रक्षणासाठी कटीबद्ध असणाऱ्या सर्वांनी भाजपा नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारच्या लाेकशाही विराेधी कृतीचा निषेध करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या वेळी झाकी पटेल,तनझीर सैय्यद, दिलनवाज सैय्यद, साेहेल बिसमिल, साकीब देशमुख यांची उपस्थिती हाेती.

बातम्या आणखी आहेत...