आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रात्यक्षिके:केमिस्ट भवनामध्ये योगाची प्रात्यक्षिके; शाखा कार्यालयातील कर्मचारी सहभागी

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व शाखा कार्यालय कर्मचारी आणि विमा प्रतिनिधींसाठी मंगळवारी केमिस्ट भवन जळगाव येथे जागतिक योग दिनानिमित्ताने विविध योगाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

जळगाव, भुसावळ शाखा कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले. यावेळी विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक जावेद अहेमद, दत्तकगृह-शिशूगृह अधीक्षिका वर्षा वाणी यांची विशेष उपस्थिती लाभली. योग विद्या व योगासने याबाबत वर्षा वाणी आणि जयश्री पाटील यांनी मार्गदर्शन केले. यात त्यांनी याेगाचे महत्त्व पटवून दिले. प्रशासकीय विकास अधिकारी शिरीष तारे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास जावेद अहेमद, शिरीष तारे, परेश वाणी, कृष्णा घुगे, स्वाती कुलकर्णी, आसिफ तडवी यांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...