आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्याप 19 अहवाल प्रलंबित:शासकीय अहवालात डेंग्यू कमी; प्रत्यक्षात रुग्ण अधिक

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय अहवालात डेंग्यू संशयितांची संख्या कमी होताना दिसून येत असली तरी शहरासह जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापांची फणफण कायम आहे. लहान मुलांमध्ये तापाची साथ अधिक असल्याचे दिसून येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि खासगी दवाखान्यांच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

गेल्या १५ दिवसांत जळगाव जिल्ह्यात १९ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून अहवाल प्रलंबित आहे. खासगी रुग्णालयांत दररोज तीन ते चार संशयित आढळून येत असून उपचाराने बरे हाेत आहेत. म्हणून शासकीय अहवालात रुग्ण कमी झाल्याचे दिसून येत आहे. ताप, घशात दुखणे, पोटदुखी, उलटी, मळमळ, अशक्तपणा आदी लक्षणे घेऊन रुग्ण खासगी रुग्णालयात जाताहेत. जिल्ह्यात ११ महिन्यांत ४३७ संशयितांच्या तपासण्या झाल्या. त्यात ११९ पॉझिटिव्ह आढळले. यापैकी ४८ ग्रामीणचे तर ७१ शहरातील आहे.

बातम्या आणखी आहेत...