आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी साेमवारी देऊ घातलेला अध्यक्ष पदाचा राजीनामा त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी राेखला हाेता. दिवसभराच्या गाठीभेटी, बैठका आणि रात्री उशिरापर्यंत समर्थकांशी चर्चा केल्यानंतर अध्यक्ष देवकर यांनी अखेर मंगळवारी सकाळी ११ वाजता राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षपदी नवीन संचालकाला संधी देण्यासाठी ३ फेब्रुवारी राेजी जिल्हा बँकेत संचालकांची बैठक आयाेजित करण्यात आली हाेती. या बैठकीत अध्यक्ष देवकर यांनी साेमवारी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घाेषणा केली हाेती.
दरम्यान, साेमवारी त्यांची राजीनाम्याची अट त्यांच्या समर्थकांनी राेखली. कार्यकर्ते आणि कट्टर समर्थकांचा त्यांना दिवसभर गराडा हाेता. गेल्या पंचवार्षिकमध्ये अॅड. राेहिणी खडसे तब्बल सहा वर्षे बँकेच्या अध्यक्षा हाेत्या. दुसरीकडे अवघ्या वर्षभरात देवकरांकडे राजीनामा मागण्यात आल्याचे त्यांचे समर्थक आक्रमक झाले हाेते. कार्यकर्त्यांशी बाेलूनच निर्णय घ्या अशी आग्रही भूमिका मांडणाऱ्या समर्थकांमुळे गुलाबराव देवकर यांनी राजीनामा दाेन दिवस लांबणीवर टाकला हाेता. दाेन-तीन दिवस सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे त्यांनी माध्यमांशी बाेलताना सांगितले हाेते.
राजीनामा थांबल्याचे मुंबईपर्यंत पडसाद
साेमवारी गुलाबराव देवकर यांचा नियाेजित राजीनामा झाला नाही. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची भूमिका मांडली. त्यामुळे देवकरांच्या न झालेल्या राजीनाम्याचे पडसाद थेट मुंबईपर्यंत उमटले. पक्षश्रेष्ठीपर्यंत ही बाब गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर उशिरापर्यंत चक्र फिरले आणि देवकरांनी मंगळवारी राजीनामा देऊ असे जाहीर केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.