आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आध्यात्मिक सोहळा:संत मुक्ताबाई राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान ; पादुका पूजनाने संचारले चैतन्य

जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान रामपेठ संचालित संत मुक्ताबाई राम पालखीने मंगळवारी सकाळी ८ वाजता पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान झाले. कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडाने प्रथमच ही पायी दिंडी निघाल्याने वारकऱ्यांत उत्साहाचे वातावरण होते. दिंडीच्या रस्त्यात पालखीच्या दर्शनासाठी लहान-थोरांची गर्दी झाली होती. श्री संत मुक्ताई रामपालखीचे हे १४९वे वर्षे आहे. १० जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने मंगळवारी जळगावहून पंढरपूरसाठी श्री संत मुक्ताबाई राम पालखी मार्गस्थ झाली. श्री संत मुक्ताबाई पालखी सोमवारी श्रीराम मंदिरातून विठ्ठल मंदिर, तरुण कुढापा चौक व जोशीपेठमार्गे अप्पा महाराज समाधी मंदिरात रात्रभर मुक्कामाला होती.

रांगाेळ्या टाकून केले स्वागत शिवरायांचा धारकरी तर पांडुरंगाचा वारकरी संगमाचे आयोजन पांडे चौकात श्री संत मुक्ताबाई रामपालखी निमित्त करण्यात आले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे परिसर भगवे ध्वज, रांगोळ्या, स्वागत फलकांनी सजवला होता. पालखीचे आगमन होताच धारकऱ्यांनी पुष्पवृष्टी करत वारकऱ्यांचे स्वागत केले.

डोक्यावर तुळशी, हरिनामाचा गजर वारीत डोक्यावर तुळशी अन् मुखी हरिनामाचे गुणगाण करणाऱ्या महिला वारकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. वारकरी महिलांनी फुगड्या खेळत सहभाग नोंदवला. रस्त्यावर शहरातील विविध भागातील व परिसरातील गावकऱ्यांनी संत मुक्ताईच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. वारीत महिला व पुरष वारकरी सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...