आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात वारकऱ्यांचा विठू नामाचा गजर:मुक्ताई राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

जळगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान रामपेठ संचालित संत मुक्ताबाई राम पालखीने मंगळवारी सकाळी 8 वाजता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडाने प्रथमच ही पायी दिंडी निघत असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. दिंडीच्या रस्त्यात पालखीच्या दर्शनासाठी लहान-थोरांनी मोठी गर्दी केली होती.

श्री संत मुक्ताई रामपालखीचे हे 149 वे वर्षे आहे. 10 जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने मंगळवारी जळगावहून पंढरपूरसाठी श्री संत मुक्ताई रामपालखी मार्गस्थ झाली. श्री संत मुक्ताई पालखी सोमवारी श्रीराम मंदिरातून विठ्ठल मंदिर, तरुण कुढापा चौक व जोशीपेठमार्गे अप्पा महाराज समाधी मंदिरात रात्रभर मुक्कामाला होती. मंगळवारी सकाळी मंगेश महाराज जोशी, श्रीराम महाराज जोशी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील उपस्थित होते.

सकाळी 8 वाजता दिंडी रवाना

श्रीराम जयराम जयजय राम..., माऊली-माऊली विठू माऊली, पंढरीचा पांडुरंग व श्रीरामांच्या जयघोषात मंगळवारी सकाळी 8 वाजता श्री संत मुक्ताई रामपालखीचे श्री क्षेत्र पंढरपुरकडे प्रस्थान झाले. पालखीपुढे मंगेश महाराज जोशी यांच्या मार्गदर्शनात श्रीराम महाराज जोशी व इतर वारकऱ्यांनी एका ताला-सुरात टाळ वाजवून विठू नामाचा जयघोष केला.

भाविकांच्या डोक्यावर तळशी

वारीत डोक्यावर तुळशी अन् मुखी हरिनाम म्हणणाऱ्या महिला वारकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. वारकरी महिलांनी फुगड्या खेळत सहभाग नोंदवला. दरम्यान, रस्त्यावर शहरातील विविध भागातील व परिसरातील गावकऱ्यांनी संत मुक्ताईंच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी केली होती. वारीत जळगावसह वावळदा, शिरसोली, म्हसावद, आसोदा, चिंचोली आदी गावांतील महिला व पुरष सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...