आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:नऊ दिवसांपूर्वीच शहरातून एक वर्षासाठी हद्दपार; तरुणास मारहाण करणाऱ्या हद्दपार आरोपीला अटक

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नऊ दिवसांपूर्वीच शहरातून एक वर्षासाठी हद्दपार केलेल्या एका आरोपीला रविवारी दुपारी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपीस कंजरवाडा परिसरात एका तरुणास मारहाण करत असताना अटक केली.

आकाश उर्फ मट्या अनिल बागडे (रा. संजय गांधी नगर, सिंधी कॉलनी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आकाशवर चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. तरीदेखील तो बेकायदेशीरपणे शहरात राहत होता. शिवाय तो रविवारी दुपारी कंजरवाडा परिसरात एका तरुणास मारहाण करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार, सहायक फौजदार अतुल वंजारी, हेमंत कळसकर, सचिन पाटील, सुधीर साळवे, इम्रान सय्यद, साईनाथ मुंढे, राकेश बच्छाव यांनी कंजरवाडा परिसरातून त्याला ताब्यात घेतले.