आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांची बदली:बदली होऊनही महसूलचे ८७ अधिकारी, कर्मचारी मूळ पदस्थापनेवर आहे कार्यरत

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महसूल विभागातील अव्वल कारकून, चिटणीस, मंडळ अधिकारी संवर्गातील ८७ अधिकारी कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया पार पडलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यावर स्थगिती आली. त्यामुळे ते अधिकारी, कर्मचारी बदली होवूनही मूळ पदस्थापनेवरच कार्यरत आहेत. दोन महिन्यानंतरही या बदली प्रक्रियेवरील स्थगिती कायम आहे.

महसूलमधील ६५ अव्वल कारकून, १५ मंडळ अधिकारी व सात वाहनचालकांची गुरुवारी बदली प्रक्रिया करण्यात आलेली आहे. या बदली प्रक्रियेत भ्रष्टाचार होणार असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या अनुषंगाने तहसीलदारांवर आरोप करण्यात आलेला होता. त्या बदली प्रक्रियेच्या यादीला मान्यता देण्यात येवू नये, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करताना अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांना आस्थापना शाखेचे अधिकारी, कर्मचारी फक्त तालुका हा पर्याय टाकत असून नियुक्तीचे ठिकाण, पदस्थापना टाकत नाहीत. आस्थापना अव्वल कारकून, चिटणीस, मंडळ अधिकारी संवर्गाच्या कर्मचाऱ्यांकडून गैरव्यवहार करुन नियुक्ती देण्यात येते. ही समायोजनाची प्रक्रिया पूर्णपणे चुकीची आहे. जिल्हा परिषदेप्रमाणे महसूलची समायोजन बदली प्रक्रिया सेवा ज्येष्ठतेनुसार केल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार करण्याची संधी उपलब्ध होणार नाही, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये महसूल अधिकारी,कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबवली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यावर स्थगिती आली आहे.

बातम्या आणखी आहेत...