आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:गतीतर्फे शिक्षकांसाठी दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृतीचा विकास कार्यशाळा

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प. वि. पाटील प्राथमिक विद्यामंदिर, ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय तसेच किलबिल बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने गती इन्स्टिट्यूटतर्फे शिक्षकांसाठी दुर्ग संस्कृतीतून कार्यसंस्कृती कार्यशाळा घेण्यात आली. यात देवदत्त गोखले यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवताना गड-किल्ल्यांची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामाध्यमातून महापुरुषांचा अभ्यास करणे अगदी सोपे होते म्हणूनच या कार्यशाळेत शिवनेरी, सिंधुदुर्ग, तोरणा, पुरंदर, वज्रगड, राजगड किल्ल्यांची शिस्त, सुरक्षा स्वराज्य नियम, नैसर्गिक स्रोतांची जपणूक, महाराजांची दूरदृष्टी, किल्ल्यांची भौगोलिक रचना, त्यात घडलेल्या ऐतिहासिक घडामोडी या विषयी चर्चा करण्यात आली. कार्यशाळेसाठी समन्वयक चंद्रकांत भंडारी, मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, रेखा पाटील, मंजूषा चौधरी उपस्थित होते. पराग राणे यांनी सूत्रसंचालन केले. योगेश भालेराव यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...