आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव:देवेंद्र फडणवीस कुठलीही माहिती न घेता रुग्णसेवेबद्दल खोटे बोलले, डॉक्टर-परिचारिकांनी केला तीव्र निषेध

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या राज्यभर दौरा करून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जळगावातील उल्हासराव पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचा देखील आढावा घेतला. दरम्यान या महाविद्यालयाबद्दल फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे डॉक्टर परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी निषेध केला आहे. सोबतच कामबंद करण्याचा इशारा देखील दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील साकेगाव येथील डॉ. उल्हासराव पाटील वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली होती. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी गोदावरी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गैरसोय होते. तसेच सेवा व्यवस्थित पुरवली जात नसल्याचा तथ्यहीन आरोप केला होता. गोदावरीच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांनी तीव्र निषेध केला असून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही माहिती न घेता आरोप केले

'दोन महिन्यांपासून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार स्वत:च्या घरापासून लांब राहुन रात्रंदिवस रुग्णांची सेवा करत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न काही तथाकथित राजकीय नेत्यांकडून केला जात आहे' असे मत रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही माहिती न घेता आरोप केले असल्याचे केलेल्या वक्तव्याचाही परिचारिकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser