आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात महाविकास आघाडीविरुद्ध भाजप हा संघर्ष जनतेला नवा राहिलेला नाही. यातच राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह सादर केला होता. यात गिरीश महाजन यांना विनाकारण एखाद्या प्रकारात अडकवण्याचा कट रचला जात आहे, त्याचे पुरावे दिले होते. यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. तर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अजून 4 पेन ड्राईव्ह बाहेर येतील असा गौप्यस्फोट केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये खरे पुरावे नाहीत, तर प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा का घेतला, असा सवाल रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला आहे. पेन ड्राईव्हमध्ये सर्व खरे आहे, म्हणूनच आम्ही चौकशीची मागणी केली, असे सांगत सर्व दोषीवर कारवाई व्हावी, अशी मागणी दानवेंनी केली आहे. सीडी कधी येते याची वाट बघतोय, मग आम्ही अजून ४ पेन ड्राईव्ह बाहेर काढू, असा टोला रावसाहेब दानवेंनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे.
महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना - फडणवीस
महाविकास आघाडातील अनेक नेते सूड उगवण्याचे कामत करत आहेत. साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे कसे मॅनेज केले जात आहे. याबाबतची माहिती विधानसभा अध्यक्षांना दिली आहे. यात सरकारी वकील कशी मदत करतात याचे पुरावे आम्ही सादर केले आहे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. हा महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेला महाकत्तलखाना आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह 28 जणांवर कसे गुन्हे दाखल करण्यात आले. याची संपूर्ण माहिती त्या पेन ड्राईव्हमध्ये असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. आज महाजनांच्या मुलींचा विवाह सोहळा पार पडला. याप्रसंगी राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व नेते एकत्र आले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.