आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:गणिताच्या परीक्षांमध्ये अांतरराष्ट्रीय पातळीवर १२ सुवर्णपदके जिंकून जळगावच्या देवेश भय्याने सातासमुद्रापार राेवला झेंडा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाकाळात केले ‘संधीचे सोने’; दहा महिन्यांत ऑनलाइन स्पर्धांमध्ये सहभाग

कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षण क्षेत्रात ऑनलाइनच काम सुरू होते. जळगावच्या देवेश भय्या या अवघ्या बारा वर्षाच्या विद्यार्थ्याने पालकांच्या मार्गदर्शनाने ऑनलाइन परीक्षांची संधी हेरली आणि अवघ्या दहा महिन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करीत आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध देशांमधील गणिताच्या परीक्षांमध्ये यशस्वी होत बारा सुवर्णपदके प्राप्त करत शहराचे नाव जगभरात उंचावले आहे.

अमेरिकेतील जॉन हापकिन विद्यापीठाच्या सॅट जनरल मॅथ परीक्षेत देवेशने ८०० पैकी ८०० गुण मिळवत ‘ग्रँड ऑनर अवॉर्ड मेडल’ प्राप्त करीत १२व्या वर्षी या विद्यापीठाच्या सेंटर फॉर टॅलेंट यूथ’मध्ये स्थान मिळवले अाहे. थायलंड इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिंपियाड, साऊथ ईस्ट एशियन मॅथेमॅटिक्स ऑलिंपियाड, इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिंपियाड या तीनही परीक्षेत त्याने प्रथम वर्ल्ड रँक मिळवत सुवर्णपदके मिळवली. सिंगापूर अ‍ॅण्ड एशियन स्कूलमध्ये मॅथ्स ऑलिंपियाड, इंटरनॅशनल ज्युनियर मॅथ ऑलिंपियाड, हाँगकाँग इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलिंपियाड, इंटरनॅशनल मॅथ कांगारू कॉम्पिटिशन, सिंगापूर इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड चॅलेंज, साऊथ ईस्ट एशियन मॅथेमॅटिक्स ऑलिंपियाड एक्स नेक्स्ट लेव्हल या सहा परीक्षेत देवेशला ‘इंटरनॅशनल गोल्ड मेडल’ प्राप्त झाली. तीन परीक्षेत देवेशला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ होण्याचा सन्मानदेखील लाभला.

अमेरिकन मॅथ कॉन्टेस्टमध्ये ऑनरचा बहुमान
देवेशने वर्ल्ड इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलिंपियाडमध्ये द्वितीय रँक तर आशिया इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिंपियाडमध्ये तृतीय रँक (वर्ल्ड सेकंड रनर अप) हे स्थान प्राप्त करीत त्याने आणखी दोन सुवर्णपदके पटकावली. या बारा सुवर्ण पदकांशिवाय याच कालावधीत देवेशला अमेरिकन मॅथ कॉन्टेस्ट (इ.८ वी) मध्ये प्रथम रँक,अमेरिकन मॅथ कॉन्टेस्ट (इ.१० वी) मध्ये ‘ऑनर’चा बहुमान मिळाला. ऑस्ट्रेलियन मॅथ कॉन्टेस्टमध्ये त्याने ‘हायर डिस्टिंग्शन’ तर पर्पल कामेंट मॅथ मीटचा तो ‘विजेता’ ठरला.

गुण मिळवत ‘ग्रँड ऑनर अवॉर्ड मेडल’ प्राप्त करीत १२व्या वर्षी या विद्यापीठाच्या सेंटर फॉर टॅलेंट यूथ’मध्ये स्थान मिळवले अाहे. थायलंड इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिंपियाड, साऊथ ईस्ट एशियन मॅथेमॅटिक्स ऑलिंपियाड, इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिंपियाड या तीनही परीक्षेत त्याने प्रथम वर्ल्ड रँक मिळवत सुवर्णपदके मिळवली. सिंगापूर अ‍ॅण्ड एशियन स्कूलमध्ये मॅथ्स ऑलिंपियाड, इंटरनॅशनल ज्युनियर मॅथ ऑलिंपियाड, हाँगकाँग इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलिंपियाड, इंटरनॅशनल मॅथ कांगारू कॉम्पिटिशन, सिंगापूर इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड चॅलेंज, साऊथ ईस्ट एशियन मॅथेमॅटिक्स ऑलिंपियाड एक्स नेक्स्ट लेव्हल या सहा परीक्षेत देवेशला ‘इंटरनॅशनल गोल्ड मेडल’ प्राप्त झाली. तीन परीक्षेत देवेशला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ होण्याचा सन्मानदेखील लाभला.

‘बेस्ट ब्रेन ऑफ इंडिया’ म्हणून निवड
देवेश हा जळगावच्या एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्ता सातवीचा विद्यार्थी असून, व्यंकटेश कॉलनीमधील रहिवासी आर्किटेक्ट पंकज भय्या व इंटिरियर डिझाइनर पल्लवी भय्या यांचा तो सुपुत्र आहे. गेल्या वर्षी देवेशला पंतप्रधान बालशक्ती पुरस्काराने राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या उपस्थितीत दिल्लीत गौरवण्यात आले होते. त्याची ‘अ‍ॅलन चॅम्प २०२० बेस्ट ब्रेन ऑफ इंडिया’म्हणूनदेखील निवड करण्यात अालेली अाहे.

बातम्या आणखी आहेत...