आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव महापालिका आयुक्तपदी काेण? याचा निर्णय ५ जानेवारीपर्यंत लांबणीवर पडला आहे. कार्यरत आयुक्त देविदास पवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर बाजू मांडण्यासाठी डाॅ. विद्या गायकवाड यांच्या वतीने मुदत मागण्यात आली. नाताळची सुटी असल्याने आता नवीन वर्षातच कामकाज हाेईल.
राज्य शासनाने गायकवाड यांची आयुक्तपदावरून उचलबांगडी केली. त्यांच्या जागी देविदास पवारांची नियुक्ती केली; परंतु गायकवाड यांची पदस्थापना केली नव्हती म्हणून त्यांनी मॅटमध्ये आव्हान दिले. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. ९ राेजी सूचना केल्याप्रमाणे आयुक्त पवार यांनी २० राेजी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात रुजू हाेण्याबाबत गायकवाड यांना अवगत केले हाेेते. त्यामुळे एकतर्फी पदभार घेतला असे म्हणता येणार नाही. मी पदभार घेऊन शासनाच्या व्हिडिआे काॅन्फरन्सिंगला उपस्थित हाेताे असे मुद्द मांडले. गायकवाड यांच्या वतीने प्रतिज्ञापत्रावर उलटतपासणीसाठी मुदत मागण्यात आली. त्यामुळे मॅटने ५ जानेवारी राेजी सुनावणी घेण्याचे जाहीर केले. शासनातर्फे मुख्य सादरकर्ता अधिकारी मिलिंद महाजन, आयुक्त पवार यांच्यातर्फे अॅड. सिद्धेश्वर ठाेंबरे तर डाॅ. विद्या गायकवाड यांच्या वतीने अॅड. अविनाश देशमुख यांनी काम पाहिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.