आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्तराने स्वागत:ओंकारेश्वर मंदिरात स्वातंत्र्यदिनी भाविकांचे अत्तराने हाेणार स्वागत

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ओंकारेश्वर मंदिरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भाविकांचे १६ प्रकारच्या अत्तराने स्वागत करण्यात येणार आहे. तसेच श्रावण सोमवारनिमित्ताने सोमवारी दिवसभर खुले राहणार आहे. श्रावण सोमवार व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने मंदिर परिसराला विशेष सुशोभित करण्यात येणार आहे. या निमित्ताने भाविकांना जाण्या-येण्यासाठी तिरंगा पाइपचे रेलिंग तयार करण्यात आले आहे.

तसेच मंदिराला तिरंग्याच्या रंगात सजवण्यात आले आहे. यात देवांच्या शृंगारासाठी मुंबईहून विशेष तिरंगा रंगात हार मागवण्यात आले आहे. तसेच यानिमित्ताने मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला १६ प्रकारचे अत्तर एकत्रित करून लावण्यात येणार आहे. हे अत्तर खास भाविकांसाठी कन्नोज (उत्तर प्रदेश) येथून आणण्यात आले आहे. ओंकारेश्वर मंदिरात सकाळी ८ वाजता ११ ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर सायंकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत सत्संग भजन मंडळातर्फे करण्यात येणार आहे. याच प्रमाणे प्रतिसोमवारप्रमाणे शिवाभिषेक, महाआरती नित्य कार्यक्रम होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...