आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेसमेंट, पार्किंगचा अनधिकृत वापर:डी.एच. प्लाझा संकुलातील सराफा व्यावसायिक धडकले पालिकेवर

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सराफ बाजारात डी.एच. प्लाझा या संकुलातील अतिक्रमणाविराेधात त्याच मार्केटमधील सराफा व्यावसायिक एकवटले आहेत. पार्किंगएेवजी बेसमेंटचा व्यावसायिक वापर हाेताे आहे. याशिवाय मार्केटमधील अतिक्रमणावर कारवाईची मागणी करत साेमवारी दुपारी वाजत गाजत त्यांनी माेर्चा काढला.

सराफ बाजारात महालक्ष्मी मंदिरासमाेर दिलीपकुमार हिराचंद जैन यांनी डी. एच. प्लाझा हे संकुल उभारले आहे. संकुलातील दुकाने सराफा व्यावसायिकांनी खरेदी केली आहेत; परंतु महापालिकेने मंजूर केलेल्या नकाशानुसार तळमजल्यावर पार्किंगची जागा असतानाही त्या ठिकाणी दुकान तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना पार्किंगची जागा उपलब्ध हाेत नाही. जैन यांच्याकडून तळमजल्यावरील दुकाने भाड्याने देऊन सराफा व्यावसायिकांकडून ५० हजार रुपये भाडे महिन्याला घेतले जात असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. याशिवाय पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील दुकानांच्या शेवटी बेकायदेशीर खाेल्या तयार केल्या आहेत. शाैचालय व बाथरूमचा आकार कमी करून अतिक्रमण केले आहे. डी.एच. प्लाझामधील सराफा व्यावसायीकांच्या संतप्त प्रतिक्रीया लक्षात घेता नगररचना विभागाचे रचना सहायक प्रसाद पुराणीक यांना तातडीने पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यांनी नकाशा व प्रत्यक्ष बांधकामाची तपासणी केली.

बातम्या आणखी आहेत...