आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप:इंधन दरवाढीमुळे काँग्रेसचे वाहनांना दोर बांधून ‘ढकलगाडी आंदोलन’

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीसारखा भाजपचा कारभार

पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने होणाऱ्या दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या आंदोलनानंतर काँग्रेसचे जिल्हास्तरावरील नेते रस्त्यावर उतरले. वाहनांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी चक्क वाहनांना दोर बांधून ढकलगाडी आंदोलन केले.

केंद्रातील भाजपचे सरकार महागाईवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या काळात १३६ दिवस पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखून धरली आणि निवडणुका संपताच दररोज दरवाढ केली जात आहे.

सर्वसामान्यांना त्रस्त करणाऱ्या महागाईविरोधात आवाज बुलंद करत झोपी गेलेल्या केंद्रातील भाजप सरकारला सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलनाचा सप्ताह आयोजित केल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या नेतृत्वात व जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार व युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत शास्त्री टॉवर येथे महागाईमुक्त भारत आंदोलनांतर्गत पेट्रोल- डिझेल- गॅसच्या रोजच्या दरवाढीच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...