आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवकॉलनी रस्त्यावरील गटारीचा ढापा तुटलेला आहे. लोखंडी सळई गेल्या सहा महिन्यांपासून उघड्या आहेत. शहर वाहतूक शाखेचे बॅरिकेट्स दोन्ही बाजूला तेथे लावलेले आहेत. अर्थात, यामुळे अर्ध्या रस्त्यावरूनच नागरिकांना जा-ये करावी लागत आहे. त्यामुळे वेळप्रसंगी अपघाताचा धोका वाढला आहे.
शिव कॉलनीतील हा मुख्य रस्ता असल्याने येथून सतत वाहतूक सुरू असते. या रस्त्यावरून आशाबाबा नगरासह पिंप्राळ्यात दाखल होण्याचा शॉटकट रस्ता आहे. म्हणून येथे सतत वाहतूक सुरू असते. गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून हा ढापा तुटलेला आहे. मात्र, तरीही त्याची दुरुस्ती होत नसल्याने लोकभावना अधिक तीव्र होताहेत.
सहा महिन्यांपासून समस्या
शिव कॉलनीतील या रस्त्याच्या गटारीवरचा ढापा अर्धा तुटला आहे. त्याच्या लोखंडी सळई उघड्या आहेत. अर्धा रस्ता रहदारीस बंद झाला असून हा ढापा त्वरित दुरुस्त करावा.
- राहुल पाटील, शिव कॉलनी
रस्ता बंद होण्याची शक्यता
रात्री-अपरात्री येथे अपघाताचा धोका आहे. वित्त व जीवितहानी होण्यापूर्वीच महापालिकेच्या संबंधित विभागाने ढापा दुरुस्ती करावी. अन्यथा येथील लोकभावनांचा उद्रेक होऊ शकतो.
- भानुदास बाविस्कर, आशाबाबानगर
वाईटपणा घेणार कोण?
लोकप्रतिनिधी व अधिकारीही या रस्त्याने ये-जा करतात. त्यांना ही समस्या दिसत नसेल का? असा प्रश्न पडतो. तक्रार देण्यासाठी वाईटपणा कोण घेईल? अशी वस्तुस्थिती आहे.
- दिलीप वाणी, शिव कॉलनी परिसर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.