आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाकडून रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्यांच्या पातळीवर औषध खरेदीसाठी मान्यता मिळाल्यामुळे त्यानुसार कार्यवाही करून आवश्यक औषधे रुग्णांना पुरवली जात आहे. शासनासह जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समिती यांच्या निधीतूनही औषधांची खरेदी केली जाते. मधुमेहींची संख्या वाढत असताना त्यांना जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात मोफत औषधे मिळण्यासह सांसर्गिक आजारांची तपासणी देखील करता येणार आहे.
औषधांचा साठा पुरेसा असल्यामुळे रुग्णांना मधुमेह, रक्तदाब, सर्दी, खोकला, ताप, जुलाब यासह विविध आजारांवरील ३०० ते ४०० प्रकारची औषधे आरोग्य केंद्रातून मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या नियंत्रणात ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र, ४४२ उपकेंद्रे आणि ११ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आहे.
याठिकाणी रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांना आवश्यक औषधे मोफत दिली जातात. या केंद्रांसाठी शासनाकडून औषधांचा पुरवठा केला जातो. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर औषधसाठा पुरवण्याची गती मंदावली आहे. ती पूर्वपदावर आणण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जात आहे. औषधाशिवाय रुग्णांचा खोळंबा होऊ नये म्हणून स्थानिक पातळीवर खरेदीचे अधिकार देण्यात आले आहे. त्यामुळे मधुमेही रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
ही मिळतात औषधी
मधुमेह रुग्णांसाठी आवश्यक असणारी मेटफॉरमिन टॅब ५०० एमजी, ग्लिमीपेराइड २ एमजी, रक्तदाबावरील हायड्रोक्लोरोथीअझाइड २५ एमजी व अन्य औषधी आरोग्य केंद्रात मोफत दिल्या जातात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.