आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Diagnosis Of Microscopic Lesions Of The Iris Of The Eye, Also Easy To Remove The Number Of Implant Lenses For Cataract Surgery | Marathi News

दिव्य मराठी विशेष:डोळ्यातील बुबुळाच्या सूक्ष्म जखमांचे निदान, मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी प्रत्यारोपण लेन्सचा नंबर काढणेही सुलभ; शासकीय रुग्णालयात ऑटोरेप केराटोमीटरवर होणार नेत्रतपासणी

जळगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत्रशल्य चिकित्सा विभागात अत्याधुनिक ऑटोरेप व केराटोमीटर मशीनची सेवा उपलब्ध झाली आहे. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी मशीनची पाहणी केली. या मशिनमुळे डोळ्यातील बुबुळांच्या सूक्ष्म जखमांचे निदान व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी प्रत्यारोपण लेन्सचा नंबर काढणे सुलभ होईल. उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. श्रद्धा महाडिक, डॉ. संजय धुमाळे, डॉ. निखिलेश शेट्टी, डॉ. सुप्रिया सोनवणे, डॉ. तुषार बोंबटकर उपस्थित होते. ऑटोरेप व केराटोमीटर या मशीनचा रुग्णांच्या आजाराचे निदान करण्यासाठी फायदा होतो.

त्यात चष्म्याचा नंबर काढणे, गुंतागुंतीची तपासणी, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी प्रत्यारोपण करणाऱ्या लेन्सचा नंबर काढणे, काळ्या बुबुळाची आडवी व उभी भुजा मोजण्यासाठी उपयोग होतो आहे. यामुळे कमी वेळेत जास्त रुग्ण तपासणी होईल.

बातम्या आणखी आहेत...