आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा:थर्ड पार्टी ऑडिटमध्ये आणि मनपाच्या तपासणीत पेव्हर ब्लॉकच्या गुणवत्तेबाबत तफावत

जळगांवएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आयुक्तांकडून होणार विचारणा या संदर्भात आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना विचारणा केली असता त्यांनी तिसऱ्या पक्षाकडून आलेल्या तपासणी अहवालातील नोंदी खूप वेगळ्या असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ही ‘थर्ड पार्टी’ तपासणीच्या नोंदी काळजीपूर्वक घेते की नाही किंबहुना, कामांची तपासणी प्रत्यक्ष कामांच्या ठिकाणी जाऊन केली जाते की नाही, याबाबत तंत्रशिक्षण विभागाच्या संचालकांना पत्र पाठवून विचारणा केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. हा प्रकार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या कानावरही घालण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. यासाठी महाविद्यालयातील तीन सहकारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी एकत्रित जातात. पालिका अभियंत्यांनाही बोलावून घेतले जाते. पेव्हर ब्लॉक तपासणी करायची असल्यास तीन नमुने घेतात. कॉम्प्रेसिव्ह टेस्टिंग मशीनने भार वाहक क्षमता तपासली जाते,

पालिकेच्या तपासणी पद्धतीवरच शंका या प्रकरणात ‘थर्ड पार्टी’ म्हणून कामांचे परीक्षण करणाऱ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बांधकाम विभागाचे प्राध्यापक व्ही. टी. पाटील यांना संपर्क करून आकड्यांतील तफावतीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी थर्ड पार्टी परीक्षण अहवालातील आकडेवारी सत्यच असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, कोणत्या वस्तूचा दर्जा कसा मोजायचा याबाबत काही स्पष्ट संकेत आहेत. रिबॉण्ड हॅमर गनचा वापर तोडता न येणाऱ्या कामांचा दर्जा तपासणीसाठी होतो. उदा. काँक्रीटची कामे, बांधकामातील काँक्रीटचे बीम, पोल इत्यादि. पेव्हर ब्लॉक हा यंत्रात तोडून त्याची भार वाहक क्षमता तपासता येते. त्यामुळे त्यावर हॅमर गनचा वापर करणे चुकीचे आहे. याबाबत महापालिकेच्या अभियंत्यांना माहिती असली पाहिजे. पण तरीही ते या गनचा वापर पेव्हर ब्लॉकच्या दर्जा तपासणीसाठी करीत असतील तर त्यांच्या माहितीविषयी शंका येते. महापालिका अभियंत्यांनी पुन्हा नमुना आणावा, आम्ही त्यांच्यासमोर तपासून द्यायला तयार आहे. कारण ही तपासणी ३०० टन क्षमतेच्या कॉम्प्रेसिव्ह टेस्टिंग मशीनने करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...