आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता खाेदकाम:दूध फेडरेशनच्या रस्त्यावर खड्डे बुजवताच ‘अमृत’साठी खोदकाम

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दूध फेडरेशनच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू झालेले असताना अचानक साक्षात्कार झालेल्या महापालिकेने अमृत योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू केले. जर या रस्त्यावर डांबरीकरण झाले असते तर खाेदकामाने रस्त्याची काय स्थिती झाली असती असा सवाल उपस्थित होत आहे.

दूध फेडरेशन ते शिवाजीनगर उड्डाणपुलादरम्यानचा रस्ता खराब आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोन वेळा रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. महापौर जयश्री महाजन यांना घेरावदेखील घालण्यात आला होता. त्यानंतर तातडीने मक्तेदाराने या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. असे असताना अमृत योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी बुद्धविहार ते दूध फेडरेशनदरम्यान नव्याने खोदकाम करण्यात आले आहे.
महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच शंका
महापालिकेकडून सातत्याने रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ना-हरकत दिली जात आहे. शिवाजीनगर रस्त्यावरही सर्वच कामे पूर्ण झाल्याने डांबरीकरणाचे काम सुरू होईल असे सांगितले जात आहे; परंतु अमृत योजनेसाठी खोदकाम होत असल्याने मनपा नियोजन करते की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बेभरवशाचा कारभार
शिवाजीनगरातील नगरसेवक अॅड. दिलीप पाेकळे यांनी मनपाच्या कार्यपद्धतीवरच शंका उपस्थित केली. शिवाजीनगर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मंजूर आहे. खड्डे बुजवले जात असून, लवकरच कामाला सुरुवात हाेईल. जर डांबरीकरणाचे काम झाले असते तर मग रस्ता खाेदकाम केला असता का? मनपाचा कारभार बेरभवशाचा झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...