आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाेदकाम:गणेश काॅलनी ते काेर्ट रस्त्यावर महापालिकेकडून खाेदकाम सुरूच

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे रस्त्याचे काम सुरू हाेत नसल्याने महापालिकेकडून मक्तेदाराची काेंडी केली जात आहे. तर दुसरीकडे महापालिकेकडून गणेश काॅलनी ते काेर्ट रस्त्यावर दरराेज खाेदकाम सुरूच आहे. दरम्यान, मक्तेदाराने जाहीर केल्याप्रमाणे या प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावर दाेन्ही बाजूने मार्किंग करण्यात आले. शासनाने दिलेल्या ३८ काेटींच्या निधीतून १० रस्त्यांच्या कामांना सुरूवात करण्याची घाेषणा मक्तेदाराने केली आहे.

गणेश काॅलनी ते काेर्ट चाैक या रस्त्यापासून या कामांना सुरूवात हाेणार आहे. त्यासाठी मक्तेदाराकडून गुरूवारी सकाळपासून रस्त्याच्या दाेन्ही बाजूने माेजणी करण्यात आली. दुभाजकापासून दाेन्ही बाजूने प्रत्येकी साडे सात मीटर अंतरावर सिमांकन करण्यात आले. त्यामुळे दीड किमीचा रस्त्यावर एकूण १५ मीटर रूंद रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. मार्किंग केल्यानंतर रस्त्याची साफसफाई केली जाणार आहे. मक्तेदाराकडून कामाला सुरूवात हाेत असताना पावसाने गुरूवारी पहाटे हजेरी लावली. त्यामुळे रस्ते आेले झाले हाेते. पावसाने हजेरी न लावल्यास वेळेत रस्त्याचे काम करणे शक्य हाेणार आहे.

पालिकेने केले पुन्हा खड्डे : मनपाने शहरातील रस्त्यांच्या कामासाठी दबाव वाढवला आहे. त्यामुळे मक्तेदाराकडून रस्त्याची माेजणी सुरू झाली आहे. दरम्यान, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून या रस्त्यावर खाेदकाम सुरूच आहे. काेर्टासमाेर पुन्हा दाेन तर रिंगराेडजवळ एक खड्डा खाेदण्यात आला आहे. पालिकेने रस्त्याच्या कामाला गती येण्यापूर्वी प्रलंबित कामे पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त हाेत आहे. अन्यथा डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खाेदकाम झाल्यास रस्त्यांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही.

बातम्या आणखी आहेत...