आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र शासनाने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनमुळे अनेक राज्यांमध्ये हिंसक आंदोलन सुरू आहे. राज्यातही त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभुमीवर राज्यात तरुणांनी शांतता व सुव्यवस्था राखावी यासाठी पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी नुकतीच प्रत्येक जिल्ह्याचे पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांची ऑनलाइन मिटींग धेऊन सूचना केल्या आहेेत. यानंतर जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पावने दोन मिनीटांचा व्हिडीओ शेअर करुन तरुणांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
‘अग्निपथ कही जीवन को लथपथ न कर दे, अग्निमार्ग नही अहिंसा मार्ग से किजीए आंदोलन’ या वाक्याने व्हिडीओची सुरूवात केली आहे. यात पोलिस, सैन्य दलात भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना विषेश करुन आवाहन करण्यात आले आहे. इतर राज्यांत सुरू असलेल्या हिंसक आंदोलनात सहभागी होऊ नका. या योजनेच्या संदर्भात आपल्या मागण्या, सूचना, बदल सुचवायचे असल्यास सनदशीर मार्गाने परवानगी घेऊन आंदोलन करा, निवेदन द्या. हिंसक आंदोलनात सहभाग आढळुन आल्यास त्यांची नोंद घेतली जाईल. आक्षेप नोंदवले जातील. यामुळे पोलिस, सैन्यासह कोणत्याही सरकारी नोकरीत आपण पात्र ठरणार नाही असाही उल्लेख डॉ. मुंढे यांनी केला आहे.
पोलिस ठाण्यांना दिल्या सूचना
पोलिस महासंचलकांनी दिलेल्या सूचनानंतर पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी लागलीच जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनाही सूचना केल्या आहेत. पोलिस ठाण्यांच्या हद्दीत काही तरुण अशा प्रकारे आंदोलनाची तयारी करीत असल्यास त्यांची माहिती घेऊन प्रतिबंध करावा असे कळवण्यात आले आहे. गाेपणीय शाखांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.