आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:मालकाचे पैसे घेऊन बेपत्ता;  कारागिरास अटक

जळगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सराफ बाजारातील सराफ व्यावसायिकाचे सोने व मालकाचे पैसे घेऊन बेपत्ता झालेल्या कारागिरास सोमवारी शनिपेठ पोलिसांनी भटिंडा (पंजाब) येथून अटक करण्यात आली.

बापन मंटू कारक (वय २८, रा. पश्चिम बंगाल, ह. मु. मारोतीपेठ, जळगाव) असे अटक केलेल्या कारागिराचे नाव आहे. मारोतीपेठ येथील रहिवासी सुशांत तारकनाथ भुतका (वय ४२) यांच्याकडे तो सोन्याच्या कारागिराचे काम करीत होता. त्याने भुतका यांच्याकडून २ लाख ६० हजार रुपये घेतले होते. तसेच दीपक संघवी या सराफ व्यावसायिकाकडून दागिने बनवण्यासाठी घेतले होते. अशी त्याने ५ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. पाच दिवसांपूर्वी बापन शहरातून बेपत्ता झाला होता. तो भटिंडा येथे चुलत भावाकडे असल्याची माहिती शनिपेठ पोलिसांनी काढली.

त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे, रवींद्र बोदवडे, अमोल विसपुते, राहुल घेटे यांचे पथक भटींडाला गेले. बापन हा तेथे एका सराफ व्यावसायिकाकडे कामाला लागला होता. पोलिस आल्याचा सुगावा लागताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी दोन-अडीच तास पाठलाग करून अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या.

बातम्या आणखी आहेत...