आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाैरीं विसर्जन:मेहरूण तलाव, गिरणा नदीवर रात्री आठ वाजेपर्यंत 183 गाैरींचे विसर्जन

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेनपावलांनी आलेल्या गाैराईला साेमवारी मूळ नक्षत्रावर मुखवटे हलवून पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन निरोप देण्यात आला. त्यानंतर कुठेही धातू, कायम स्वरूपाच्या मूर्तीचे विसर्जन न करता फक्त मुखवट्याचे विसर्जन करण्यात आले. मेहरूण तलावावर ६०, गिरणा नदीसह इतर ठिकाणी १२३ अशा १८३ गाैरींचे रात्री आठ वाजेपर्यंत विसर्जन करण्यात आले, अशी माहिती महापालिकेचे कर्मचारी बाळा चव्हाण यांनी दिली.

समृद्धी घेऊन तीन दिवसांसाठी माहेरी आलेल्या गाैरीला निराेपावेळी आरती करून पारंपरिक गीते गाण्यात आली. रांगोळ्या, फुलांच्या गालिचांची सजावट करण्यात आली होती. सुवासिनींनी पारंपरिक वेशभूषा करून गौरीपूजन केले. अनेक घरांमध्ये गिरिधारी पर्वत, हळदी-कुंकवातील महालक्ष्मी, गरुडावर आरूढ झालेली लक्ष्मी अशा आकर्षक सजावटी करण्यात आल्या होत्या. मेहरूण तलावासह विविध भागातील नदीवर रात्री आठ वाजेपर्यंत गाैरीचे विर्सजन करण्यात आले. त्यानंतर बाहेरगावाहून आलेली पाहुणे मंडळी आपल्या गावी परतली.

असे होते नैवेद्य व सजावट
पोवत्याच्या-सुताच्या गाठी पाडून त्या सुतात हळदी-कुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडल्याच्या दिसून आले. त्यानंतर गौरींची पूजा, आरती करून नैवेद्य दाखवण्यात आला. गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर, परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकण्यात आली, असे केल्यास घरात समृद्धी नांदते व झाडाझुडपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत असल्याचेही महिलांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

बातम्या आणखी आहेत...