आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल:जळगावमध्ये दोन कुटुंबात वाद, चॉपरसह शॉकअप रॉडने एकमेकांना मारहाण

जळगाव4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन कुटुंबियांमध्ये घरगुती भांडणातून झालेल्या वादात दोघांनी एकमेकांवर हल्ले चढवले. यात चॉपर, दुचाकीच्या शॉकअपच्या रॉडने एकमेकांना मारहाण करुन जखमी केले आहे. इस्लामपुरा भागात 21 रोजी ही घटना घडली. यात रात्री उशिरा शनिपेठ पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दानिश शेख इकबाल कुरेशी (वय 19, रा. भवानीपेठ, इस्लामपुरा) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याच्या बहिणीस अशपाक शेख अजीज कुरेशी, मुस्तकीम शेख अजीज कुरेशी, राजीक शेख अजीज कुरेशी व आबेदाबी शेख अजीज कुरेशी हे चौघे वेगवेगळया करणांनी त्रास देत होते. हा त्रास असह्य झाल्यामुळे दानिश हा जाब विचारण्यासाठी त्यांच्याकडे गेला होता. याचा राग आल्यामुळे चौघांनी त्याच्यावर चॉपरने हल्ला चढवला. यात दानिशच्या कानाला दुखापत झाली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याला जखमी केले.

तर दुसरी फिर्याद मुस्तकीम शेख अजीज कुरेशी याने दिली आहे. त्यानुसार, घरगुती भांडणाच्या कारणावरुन दानिश शेख इकबाल कुरेशी व ताबीश शेख इकबाल या दाेघांनी दुचाकीच्या शॉकअपच्या रॉडने हल्ला केला. लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत नमुद केले आहे. परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले असून सहाय्यक फौजदार रघुनाथ महाजन तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...