आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Disputes Between Polices; Due To The Dialogue Of The Opposition Party Leaders, Yuva Sena's Expander Sharad Koli Has Spread From Jalgaon| Marathi News

आक्षेपार्ह भाषण प्रकरण:पाेलिसांतील विसंवाद; विराेधी पक्षनेत्यांच्या संवादामुळे युवासेनेचे विस्तारक शरद काेळी जळगावातून पसार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धरणगावात बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे युवासेनेचे विस्तारक शरद काेळी यांनी जाहीर सभेत आक्षेपार्ह भाषण केले हाेते. त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी जळगावात पाेलिसांनी गुरुवारी घेराबंदी केली हाेती. मात्र, पाेलिसांतील अंतर्गत विसंवाद आणि राज्याच्या विराेधी पक्षनेत्यांच्या मजबूत अशा संवादामुळे शरद काेळी हे नाट्यमय घडामाेडीनंतर पाेलिसांच्या हातावर तुरी देऊन जिल्ह्यातून पसार झाले. शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांची महाप्रबाेधन यात्रा सध्या सुरू आहे. बुधवारी धरणगावात त्यांची जाहीर सभा झाली. त्यात युवासेनेचे विस्तारक शरद काेळी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विराेधात वैयक्तिक टीकेसह त्यांच्या जातीबद्दलही आक्षेपार्ह व्यक्तव्य केले हाेते. या विराेधात गुर्जर समाजातर्फे पाेलिस अधीक्षकांना सामाजिक भावना दुखावल्याने दाेन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यामुळे काेळी यांच्यावर तसेच आयाेजकांविरुद्ध कठाेर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली हाेती. त्यानंतर काेळी यांना भाषणबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य करून दाेन समाजात तेढ निर्माण केल्याबद्दल शरद काेळी यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यात निलंबित पीआय किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध जसा भादंवि कलम १५३(अ) गुन्हा दाखल केला आहे ताेच या प्रकरणातही दाखल झाला असून, ताे अजामीनपात्र आहे. त्यामुळे काेळी यांना अटक करण्याची तयारी पाेलिसांनी केली हाेती.

आदेश घेऊन पाेलिस हाॅटेलवर : जिल्हाधिकारी गुप्ता यांनी काढलेल्या आदेशाची प्रत घेऊन स्थानिक गुन्हा शाखेचे पाेलिस निरीक्षक किसन नजन पाटील, शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, रामानंद पाेलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शिंदे आणि शनिपेठ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत हे रेल्वे स्टेशनजवळ ज्या हाॅटेलमध्ये शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सांवत, शरद काेळी यांचा मुक्काम हाेता तेथे संध्याकाळी ५.४५च्या सुमारास पाेहाेचले. या ठिकाणी निरीक्षक ठाकूरवाड व नजन-पाटील यांनी संपर्कप्रमुख सावंत यांना आदेश देऊन शरद काेळी यांना ताब्यात घेण्याची कल्पना दिली.

या वेळी शिवसेनेच्या वतीने आदेशात भाषण बंदीचे आदेश असल्याचे सांगून ताब्यात घेण्याचे आदेश नसल्याचे स्पष्ट करून अटकेला विराेध केला. सुमारे दीड तास हे नाट्य सुरू हाेते. या वेळी ठाकूरवाड यांनी सावंत यांच्याकडून दहा मिनिटांचा अवधी मागून घेऊन अप्पर पाेलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्याशी संवाद साधला. या वेळी शरद काेळी यांना पाेलिसांनी घेरले हाेते. सुरुवातीला डीवायएसपी गवळी येत असल्याचे पाेलिस अधिकाऱ्यांनी शिवसैनिकांना सांगितले. उपस्थित शिवसैनिकांकडून पालकमंत्रांच्या दबावाखाली काम करीत असल्याचे म्हणून त्यांच्या विराेधात प्रचंड घाेषणाबाजीने हाॅटेल दणाणून साेडले हाेते.

शिवसैनिकांचा पाेलिसांना विराेध : हाॅटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून सर्व शिवसैनिक जिन्याने खाली आल्यानंतर पाेलिसांनी पुन्हा शरद काेळी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्कप्रमुख सावंत व सुषमा अंधारे यांनी नजन-पाटील व ठाकूरवाड यांना अटकेचे आदेश दाखवण्याची मागणी केली. अपर पाेलिस अधीक्षक गवळी यांचा पुन्हा फाेन आला. यांच्याशी बाेलणे करून द्या, अशी मागणी सावंत यांनी केली. पाेलिस काेळी यांना ताब्यात घेण्याच्या भूमिकेवर ठाम हाेते. तर शिवसैनिक अटक न करू देण्याच्या भूमिकेवर. सावंत यांनी भाषणाला बंदी आहे. सभेला हजर राहण्यास नाही. त्यामुळे शहद काेळी हे सभेच्या व्यासपीठावर उपस्थित राहतील. त्यानंतर धरणगाव येथील पाेलिस ठाण्यात मी स्वत: हजर करताे, असे पाेलिस अधिकाऱ्यांना सांगितले; परंतु पाेलिस अधिकारी हे मान्य करत नव्हते.

पाेलिस ठाण्यात पायी निघाले
अखेर सावंत यांनी पाेलिस ठाण्यात पायी जाऊन हजर हाेतील असे सांगून शहर पाेलिस ठाण्याकडे चालणे सुरू केले. त्यांच्या साेबत शरद काेळी, सुषमा अंधारे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, उपमहापाैर कुलभूषण पाटील, विराेधी पक्षनेता सुनील महाजन, माजी महापाैर विष्णू भंगाळे, गजानन मालपुरे यांच्यासह शंभरावर शिवसैनिक, पाेलिस असे व. वा. वाचनालय संकुलासमाेरून व शेजारील गल्लीतून १७ मजलीमार्गे सर्व जण टाॅवर चाैकात निघाले. त्यात पालकमंत्री आणि पाेलिस यंत्रणेच्या विराेधात घाेषणाबाजी करण्यात आली.

डीवायएसपी कुमार चिंथा अंधारातच
शहर पाेलिस ठाण्यात पाेहाेचल्यावर संपर्कप्रमुख सावंत, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, उपमहापाैर कुलभूषण पाटील हे निरीक्षक ठाकूरवाड यांच्या दालनात जाऊन चर्चा करत असताना महापाैर जयश्री महाजन यांचे सात वाजेच्या सुमारास आगमन झाले. त्यानंतर डीवायएसपी कुमार चिंथा हे या ठिकाणी आले. त्यांच्याशी वरिष्ठ पदाधिकारी संवाद साधत असताना महापाैर महाजन यांच्या खासगी वाहनातून शरद काेळी हे दाेन दिवसांपासून ज्या हाॅटेलमध्ये थांबले हाेते तेथे निघून गेले. त्यांच्या मागे काही अंतराने शहर पाेलिसांची व्हॅनही रवाना झाली. त्यानंतर काेळी हे त्यांच्या वाहनाने आैरंगाबादकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

शरद कोळींविरुद्ध गुन्हा दाखल
धरणगाव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित जाहीर सभेत मंत्री गुलाबराव पाटील व त्यांच्या समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले होते.याप्रकरणी युवा सेनेचे साेलापूर जिल्ह्यातील विस्तारक शरद कोळी यांच्याविरुद्ध गुरुवारी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील लाेहार गल्लीतील प्रभुदास उर्फ बालू रोहिदास जाधव (वय ५०) यांनी या संदर्भात धरणगाव पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काेण आहेत शरद काेळी?
वादग्रस्त विधने करणारे शरद काेळी हे मुळचे साेलापूर जिल्ह्यातील आहेत. ते ‘धाडस’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी समर्थकांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून समर्थकांसह मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना युवासेनेचे विस्तारक हे पद देण्यात आले. धाडस संघटनेचे काम करीत असताना त्यांच्याविरुध्द सांगोला पोलिस ठाण्यात खंडणी, दमदाटी व मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.

बातम्या आणखी आहेत...