आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंबन:आगार व्यवस्थापकांशी वाद; दाेघांचेही निलंबन

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळातील आगार व्यवस्थापकांशी वाद घातल्याने दाेन वाहकांवर शुक्रवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. आगार व्यवस्थापनाने ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. वादाच्या घटना थांबाव्या या अनुषंगाने व्यवस्थापनाने कठाेर भूमिका घेतली असल्याचे समाेर आले. ज्ञानेश्वर साेनवणे यांनी आगार व्यवस्थापक नीलिमा बागुल यांच्या कार्यालयात जाऊन वाद घातला.

तसेच गैरशिस्तीचे वर्तन केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. तर रामकृष्ण शिंदे यांनी जळगाव आगारातील चालक तथा वाहक यांना नियाेजित दुहेरी कामगिरीस जाण्यास मज्जाव केला. तसेच आगारातील अशांतता निर्माण करून महामंडळाची प्रतिमा मलिन केल्याचे निलंबन आदेशात म्हटले आहे. दाेन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचे आदेश नाेटीस बाेर्डावर लावले.

बातम्या आणखी आहेत...