आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री सिद्धिव्यंकटेश देवस्थानतर्फे जळगाव रेल्वेस्थानकात गेल्या ५३ वर्षांपासून दररोज दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत मोफत जलसेवा करण्यात येत आहे. यात महिलांचा पुढाकार हा कौतुकास्पद असाच आहे. या जलसेवेसाठी दररोज १५ हजार लिटर पाणी तर ७०० किलो बर्फ लागतो.
रेल्वेस्थानकात मोफत जलसेवेसाठी दरवर्षी श्री सिद्धिव्यंकटेश मंदिरातील भाविक पुढाकार घेतात. तापमान ४२ अंशांवर गेल्याने घशाला कोरड पडत असल्याने स्थानकावर रेल्वे आल्याबरोबर प्रवाशांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. मात्र, स्थानकातील नळांना येणाऱ्या गरम पाण्यामुळे प्रवाशांची तहान भागत नाही. तसेच १५-२० रुपये खर्च करून एका बाटलीने संपूर्ण कुटुंबाची तहान भागत नाही.
त्यामुळे श्री सिद्धिव्यंकटेश मंदिर देवस्थानने मोफत जलसेवा सुरू केली आहे. त्याचा प्रवाशांना मोठा आधार मिळाला आहे. जळगाव रेल्वेस्थानकावर यंदाच्या जलसेवेला प्लॅटफॉर्म क्रमांक तीन व चारसाठी शनिवारी करण्यात आली. तसेच येत्या काही दिवसांत एक व दोन तसेच पाच नंबरच्या प्लॅटफॉर्मवरही मोफत जलसेवा सुरू करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.