आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वखर्चाने गणवेश उपलब्ध:सुभाषचंद्र बोस संस्थेतर्फे गणवेश वाटप

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेतर्फे जिल्हा परिषदेच्या विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयात ५० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशांचे वाटप करण्यात आले.

जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी या विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने गणवेश उपलब्ध करून दिले. यावेळी शाळेअंतर्गत असलेल्या लहान मैदानावर पेव्हर ब्लॉक बसवून देण्याची मागणी प्राचार्यांसह शिक्षकांनी नियोजन अधिकारी पाटील यांच्याकडे केली. नियोजन निधीतून शैक्षणिक कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सुनीता गरुड होत्या. लेखा वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...