आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर ईडीतर्फे करण्यात येणाऱ्या कारवाईच्या विरोधात जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी भूपेंद्र जाधव, ज्ञानेश्वर कोळी, जमील शेख, अॅड. अमजद पठाण, सचिन सोमवंशी आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच अडवण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या दालनात ५० पदाधिकाऱ्यांना सोडण्यास सांगण्यात आले; परंतु नंतर अल्पबचत भवनात प्रमुख पदाधिकाऱ्यांना बसण्यात सांगण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्वत: तेथे जाऊन मोर्चाकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.