आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दावे-प्रतिदावे:जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्या; मविप्रच्या ताब्यावरून दावे-प्रतिदावे

जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्या. जळगाव (मविप्र) संस्थेच्या ताब्यावरून भोईटे व पाटील गटात दावे-प्रतिदावे सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ३ जून रोजी दिलेल्या निकालानंतर अॅड. विजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन संस्था आपल्या ताब्यात दिल्याची माहिती दिली. तर ताब्याच्या बाबतील निकालात स्पष्टता नसून, आमची याचिका डिस्पोज केली आहे, डिसमिस नाही, त्यामुळे संस्था आमच्या ताब्यात कायम असल्याचा दावा नीलेश भोईट यांनी केला आहे. याच आधारावर भोईटे यांनी १३ जून रोजी संस्थेच्या कार्यालयात को. ऑडिनेशन कमिटीची सभा घेतली. या सभेत चेअरमन गोकुळ पाटील, नीलेश भोईटे, जयंत देशमुख, महेंद्र भोईटे यांच्यासह कमिटीचे सभासद असलेले २८ मुख्याध्यापक व तीन प्राचार्य उपस्थित होते.

नेमके काय म्हणतात दोघे प्रमुख
अॅड. विजय पाटील : जिल्हा, उच्च व सर्वोच्च अशा तिन्ही न्यायालयांनी आमच्या बाजूने निकाल दिला. तरीही भोईटे स्वत:कडे ताबा असल्याचा दावा करीत आहे. त्यांनी अनेक लोकांकडून नोकरी लावून देण्याच्या नावाने सुमारे २० कोटी रुपये घेतले आहेत; परंतु संस्था त्यांच्या ताब्यात नसल्याने ते नोकरी देऊ शकत नाही. लोक पैशांसाठी तगादा लावत असल्याने ते अशा सभा घेऊन ते स्वत:चं अस्तित्व संस्थेत असल्याचा देखावा करीत आहेत. आम्ही पोलिसांना पत्र देऊन त्यांची सभा रोखण्याचा प्रयत्न केला नाही.

नीलेश भोईटे : सर्वोच्च न्यायालयाने आमची याचिका डिसमिस केलेली नाही. त्यामुळे अद्यापही धर्मादाय कायद्यानुसार ताबा आमच्याकडे आहे. आमची सभा होऊ न देण्यासाठी विजय पाटील यांनी पोलिसांना पत्र दिले होते. पण चौकशीअंती पोलिसांना सर्व बाबी स्पष्ट झाल्या. उच्च न्यायालयात आमच्या विरोधात निकाल गेला होता; पण सर्वोच्च न्यायालयात आमची याचिका फेटाळलेली नाही. सुनावणीच्या दोन महिने आधी संस्था कोणाच्या ताब्यात होती ते पाहावे, असा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात आहे. त्यामुळे आम्ही कामकाज करीत आहोत.

नव्याने आले ‘फर्स्ट अपील’; २९ रोजी पुन्हा सुनावणी
नीलेश भोईटे यांनी औरंगाबाद खंडपीठात नव्याने ‘फर्स्ट अपील’ दाखल केले आहे. धर्मादाय कायद्यानुसार संस्थेचा ताबा आपल्याकडे असल्याच्या संदर्भात हे अपील आहे. त्यावर १३ जून रोजी सुनावणीची तारीख होती. पुढील सुनावणी २९ जून रोजी न्यायाधीश दिघे यांच्या न्यायालयात होणार आहे. तहसीलदार, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वाेच्च न्यायालयात वेगवेगळे अर्ज, अपिलांवर सुनावण्या झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...