आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी निकालात खान्देशात धुळ्याची बाजी:नाशिक विभागात 96.17 मुली, तर 94.14 टक्‍के मुले झाले पास; धुळ्याचा निकाल 96.86 टक्के

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी ऑनलाइन जाहीर झाला. दुपारी 1 वाजता राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात आला. नाशिक विभागीय मंडळाचा एकूण निकाल 95.03 टक्के लागला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. निकालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा खान्देशातून पुन्हा एकदा धुळे जिल्हा सर्वोत्तम निकालासह भाव खाऊन गेला. 2018 मध्येही धुळे जिल्ह्याचा निकाल इतर जिल्ह्याच्या तुलनेत चांगला लागला होता.

धुळ्याचा टक्का अधिक

निकालात नाशिकसह नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याच्या तुलनेत धुळे जिल्ह्याचा टक्का अधिक आहे. यंदा या परीक्षेला नाशिक विभागातून 1 लाख 60 हजार 610 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 1 लाख 52 हजार 629 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल 95.03 टक्के लागला. यात जळगाव जिल्ह्याचा 95.86 टक्के, नंदुरबारचा 95.04 तर सर्वाधिक धुळे जिल्ह्याचा 96.77 टक्के निकाल लागला आहे.

मुलींनीच मारली बाजी

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या बारावी परीक्षेत देखील मुलींनीच बाजी मारत मुलांपेक्षा आम्हीच हुशार असल्याचे दाखवून दिले आहे. नाशिक विभागात उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींची टक्‍केवारी 96.17 टक्‍के तर मुलांची टक्‍केवारी 94.14 टक्‍के आहे. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका संबंधित महाविद्यालयात 8 दिवसाच्यानंतर वितरित करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...