आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबदलती लाइफस्टाइल, वाढते प्रदूषण, आनुवंशिक आजार, सकस आहाराची कमतरता यासह विविध कारणांमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. त्यात आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाणही वाढले आहे. दोन दशकांपूर्वी पन्नाशीनंतर होणारा आतड्यांचा कॅन्सर आता वीस वर्षाच्या तरुणांनाही होताना दिसताे आहे.
तरुणांमध्ये या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक असून, वेळीच निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो अन्यथा रुग्णाला आपला जीव गमवावा लागण्याची भीती असते. ३५ ते ५० या वयोगटात या कॅन्सरची लक्षणे तीव्र होताना दिसून येतात. आहाराच्या चुकीच्या सवयी वाढत असलेल्या ठिकाणी आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाणह अधिक असल्याचे दिसते. मोठे आतडे हा पचनसंस्थेतील सर्वात शेवटचा, नळीसारखा अवयव असतो. त्यात चयापचय क्रियेनंतर उरलेला सर्व माल साठवलेला असतो.
मोठ्या आतड्याचा कॅन्सर हा आतड्याच्या आतील आवरणापासून सुरू होऊन पुढे पसरतो. काही वेळेला मोठ्या आतड्यात लहान गाठी दिसून येतात. त्या सुरुवातीला कॅन्सरच्या नसतात. मात्र, अनेक वर्षे त्या आतड्यात राहिल्यास त्याचे रूपांतर कॅन्सरच्या गाठींमध्ये होऊ शकते. काेलाेनाेस्काेपी चाचणीद्वारे त्याचे निदान होते. वेळीच निदान झाले तर वैद्यकीय उपचारानंतर आतड्यांचा कॅन्सर बरा होऊ शकतो. कॅन्सरची गाठ उजव्या बाजूला आतड्यात असेल, तर हे आतडे मोठे असल्याने गाठ खूप मोठी झाल्याशिवाय त्रास सुरू होत नाही. त्यामुळे या आजाराची लक्षणे उशिरा दिसून येतात. या प्रकारच्या कॅन्सरमध्ये शौचावाटे रक्त पडून थकवा, चक्कर येण्याचा त्रास जाणवतो. त्यामुळे लक्षणे जाणवताच डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा.
बद्धकोष्ठतेकडे दुर्लक्ष नको- डॉ. नीलेश चांडक, कॅन्सरतज्ज्ञ, जळगाव
ही आहेत कारणे
अशी आहे साखळी : फर्टिलायझरयुक्त भाजीपाला, ज्वारी, बाजरी, पालेभाज्या आहारात कमी, गायी व म्हशींना फवारणी केलेला चारा देणे, दुधात योग्य घटक कमी होणे. निकृष्ट दुधापासून तयार झालेल्या वस्तू खाणे हीच कर्कराेग जडण्याची साखळी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.