आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:लग्नात डिजे, बँडबाजाची क्रेझ, आवाज 100 डेसीबलपेक्षा जास्त पण वर्षाकाठी केवळ पाच ते सात ठिकाणी कारवाई

जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नसमारंभात आता संगीत रजनी, हळदीच्या दिवशीचा डीजे लावण्याची क्रेझ वाढली आहे. इतर जिल्ह्यांमधून ६० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत भाडे खर्च करून बँडपथक मागवले जात आहेत. दरम्यान, ध्वनिप्रदूषणाच्या सर्व मर्यादा ओलांडून वाजवल्या जाणाऱ्या डीजे, बॅँडवर वर्षाकाठी पाच ते सात ठिकाणी कारवाई केली जाते. कोरोळा काळात लग्नासह इतर समारंभावर प्रचंड निर्बंध लादण्यात आले होते. आता पूर्णपणे निर्बंध हटवल्याने लोक लग्नात एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आहेत. डीजे आणि बँडवर सर्वाधिक खर्च केला जातो आहे. जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात असलेला बँड, डीजेला सर्वाधिक पसंती दिली जाते आहे. सुमारे ६० हजार रुपयांपासून दोन दिवसांसाठी बँड उपलब्ध होतो आहे. हळदीच्या रात्री चार तासांसाठी १० ते ५० हजार रुपयांपर्यंत डीजेचे भाडे मोजावे लागते आहे. चित्रपटांमध्ये दाखवत असलेल्या पद्धतीप्रमाणेच आता सामान्य लोकदेखील संगीत संध्याचा आनंद घेतात. लग्नातील इतर महत्त्वाच्या बाबींसोबतच आता डीजेवर खर्च केला जातो आहे. जळगाव जिल्ह्यात धुळे, सटाणा, येवला, कापडणे, मालेगाव येथील प्रसिद्ध बँड बोलावले जातात. सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत भाडे खर्च करून हे बँड उपलब्ध होतात. शिवाय लग्नाच्या दोन-तीन महिने आधीच अॅडव्हान्स देऊन हे बँड बुक करावे लागत आहेत.

मर्यादा ओलांडून धिंगाणा डीजे, बँड, माइकमधून दिले जाणारे भाषण अशा प्रत्येक बाबींचे ध्वनिप्रदूषणाचे निकष वेगवेगळे आहेत. आवाजाच्या मर्यादा ठरवून दिल्या आहेत; परंतु लग्न समारंभासह इतर कोणत्याही ठिकाणी हा नियम पाळला जात नाही. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. डीजे किंवा बँडमधून निघणारा आवाज हा १०० डेसिबलपेक्षा जास्त असतो. त्यामुळे मर्यादा ओलांडली जाते.

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जबाबदारी लग्नासह इतर सभा, समारंभात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची तपासणी करून आयोजकांवर कारवाईची मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळासह पोलिस विभागाची आहे; परंतु या विभागाकडून अत्यंत कमी कारवाया केल्या जातात. वर्षाकाठी पाच ते सात कारवाई होते.

बातम्या आणखी आहेत...