आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:डीजे वाजला पाेलिस ठाण्यात; गुन्हा मंडळावर

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात बुधवारी जल्लाेषात सर्वच सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणरायाचे आगमन झाले. त्यासाठी ढाेलताशे, डीजे लावण्यात आले. रिंगराेडच्या चिंतामणी मंडळाने गणरायाच्या स्वागतासाठी लावलेल्या तालावर जिल्हापेठ पाेलिसांनी ताल धरून बाप्पाची स्थापना केली. ताेच डीजे मंडळाने शिवतीर्थावर आणून वाजवला असताना हे डीजेचे वाहन जप्त करून मंडळावर कारवाई करण्यात आली. डीजेचा कायदा सर्वसामान्यांसाठी वेगळा व पाेलिसांना वेगळा आहे का? असा प्रश्न उपस्थित करून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाेलिसांच्या डीजेवर ठेका धरल्याचा व्हिडी आेच व्हायरल केला आहे.

रिंगराेडवरील चिंतामणी मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल ठाेसर यांनी याबाबत साेशल मीडियावर व्हायरल केलेल्या पाेस्ट व व्हीडि आेनुसार त्यांनी गणेश स्थापनेसाठी भुसावळ येथून ३३ हजार मानधन देऊन डीजे बाेलावला हाेता. हा डीजे जिल्हा पेठ पाेलिसांनी ठाण्यातील गणपती स्थापनेसाठी मंडळाच्या मिरवणुकीपूर्वी काही वेळ मागितला. त्यानुसार डीजे जिल्हापेठ ठाण्यात गेला. येथे पाेलिस कर्मचारी, अधिकारी, महिला पाेलिस कर्मचारी यांनी डीजेच्या तालावर ठेके धरून गणपती बाप्पाचे स्वागत केले.

त्यानंतर चिंतामणी गणेश मंडळाचे कार्यकर्ते काेर्ट चाैकात आणलेल्या मूर्तीची मिरवणूक काढण्यासाठी आले. ठिकाणी दाेन मिनिटेच डीजे वाजला त्यावेळी उपविभागीय पाेलिस अधिकारी कुमार चिंथा यांनी येऊन हे डीजेचे वाहन जिल्हापेठ ठाण्यात जमा केले. त्यामुळे रात्री उशिरा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विना डीजे गणपतीची मिरवणूक काढली. दरम्यान, जिल्हा पेठ पाेलिस ठाण्यात डीजेची गाडी आणली हाेती; परंतु डीजे वाजवला नाही. येथे लाऊडस्पीकर व इतर वाद्य वाजवल्याचे पाेलिस निरिक्षक अरुण धनावडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...