आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चातुर्मास प्रवचन:मिळालेल्या वेळेत रोज काही तरी सत्कार्य करा; चातुर्मास प्रवचनात जयपुरंदर, धुरंधर मुनींचे मत

जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संस्कृतीत ‘कृषी’ आणि ‘ऋषी’ यांना अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. भगवान महावीर यांचे निर्वाण होऊन शेकडो वर्षांनंतरही पंचमआरा, सद्य:स्थितीतही त्यांचे विचार अवलंबले जातात. जिनशासन राज्य सुरू आहे. त्यासाठी साधू-साध्वी यांचे कार्य खूप मोठे आहे. ‘देव’,‘गुरू’ व ‘धर्म’ यांच्याबद्दल ‘मेरी भावना’ या रचनेत महत्त्व सांगण्यात आले आहे. सर्व जगतचे दुःख दूर करण्याची शक्ती साधू-साध्वी यांच्यात असते. त्यांचे दर्शन, सहवास किंवा त्यांच्या सोबत घालवलेला वेळ, त्यांचे प्रवचन ऐकणे, त्यांच्या शरण जाणे आदी केले तरी दुःख दूर होते असे विचार डॉ.पदमचंद्र मुनी यांचे शिष्य जयपुरंदर मुनी यांनी गुरुवारी स्वाध्याय भवन येथील चातुर्मास प्रवचनात व्यक्त केले.

गुरूंच्या मार्गदर्शन, शरण आल्याने अनेकांचे दुःख दूर झालेले आहे. जीवनात प्रत्येकाला एक तरी गुरू असणे आवश्यक आहे. २०१४च्या जळगाव येथे झालेल्या चातुर्मास काळात घडलेली सत्यकथा त्यांनी उपस्थित श्रावक-श्राविकांना सांगितली. अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरूंच्या प्रति आदरभाव ठेवावा अशी शिकवण आजच्या प्रवचनातून श्रावक-श्राविकांना देण्यात आली. धुरंधर मुनी यांनी ‘आगम प्रवचन’ मालिकेत गुरुवारी सांगितले की, आजचा बहुतांश जनसामान्य वर्ग निद्रिस्त झालेला दिसत आहे. ज्ञानी लोक हे जागृत असतात. लोकांना, श्रावक-श्राविकांना जागृत करण्याचे काम साधू-साध्वी करतात. आपण सर्वांनी जागृत असावे. आपल्या दररोज मिळालेल्या वेळेत काही ना काही सत्कार्यात आपला वेळ सत्कारणी लावावा, असे आवाहन प्रवचनातून केले. ४ ऑगस्टपासून तीन दिवसीय स्वाध्याय शिबिर सुरू झाले आहे. त्यात जळगावसह भारतातील अन्य राज्यातून श्रावक श्राविका सहभागी झालेल्या आहे.

बातम्या आणखी आहेत...