आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनिष्ठेने सामाजिक पुनरुत्थानासाठी काम करीत राहा:जीवनात कुठल्याच गाेष्टीचा अहंकार बाळगू नका, स्वयंशिस्तीवर भर द्या; तेरापंथ ज्ञानशाळेत निर्मल नाैलखा यांनी दिला सल्ला

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात कुठल्याच गाेष्टीचा अहंकार बाळगू नका. एकनिष्ठेने सामाजिक पुनरुत्थानासाठी काम करीत राहा. स्वयंशिस्तीवर अधिक भर देऊन वाटचाल केली तर यशाचा मार्ग नक्कीच सापडताे, असा सल्ला प्रा. निर्मल नाैलखा यांनी दिला.

तेरापंथ सभेतर्फे पर्युषण महापर्वाच्या पाचव्या दिवशी ‘संस्कार’ या विषयावर ज्ञानशाळेच्या वतीने आयाेजित केलेल्या कार्यशाळेत ते बाेलत हाेते. बालकांनी ‘अर्हं अर्हं की वंदना फले’ हे गीत सादर केले. सूरजमल सूर्या यांनी कथेच्या माध्यमातून उपदेश दिला. सभाध्यक्ष जितेंद्र चाेरडिया यांनीही विचार व्यक्त केले. ज्ञानशाळा मुख्य प्रशिक्षिका विनीता समदडिया यांनीही विचार मांडले. महिला मंडळ अध्यक्षा नम्रता सेठिया, ज्ञानशाळा संयोजक नोरतमल चाेरडिया उपस्थित होते. सहसंयोजिका मोनिका छाजेड, मैनादेवी छाजेड, रितू छाजेड, श्रद्धा चाेरडिया यांनी सहकार्य केलेे. सूत्रसंचालन ज्ञानशाळा प्रशिक्षिका दक्षता सांखला यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...