आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरणच्या थकबाकीसाठीचे सात महिने संपले आहेत. पाचच महिने हातात आहेत. वरिष्ठ स्तरावरुन थकबाकी वसुलीच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. वेळ मारुन नेण्यासाठी बैठकीत बोलू नका. आता अंत पाहू नका, तुम्ही युनियनचे सदस्य असला तरी तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही.
आता जर काम झाले तर काही खरे नाही. तो अधिकारी कोणत्याही विभागाचा असो. कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महावितरणचे जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता कैलास हुमने यांनी मोठ्या प्रमाणावर थकबाकी वसुली असलेल्या अधिकाऱ्यांना दिला.
हुमने यांनी मंगळवारी जिल्हा नियोजन भवनात जळगाव परिमंडळातील महावितरणच्या थकबाकी वसुलीबाबत आढावा घेतला. प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र मारके उपस्थित होते. निवासी, औद्योगिक वसुलीचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळा, ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजना व पथदिव्यांची वीजबिलांची थकबाकी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.थकबाकीदारांचे वीज कनेक्शन जोडणी का कापण्यात आली नाही? अशी हुमने यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली.थकबाकीदारांची वीज जोडणी कापण्याचे आदेशही त्यांनी दिले.
जास्त रोष उद्भवल्यास काही दिवस कारवाई थांबवून पुन्हा कारवाई सुरु करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.तुमच्या पातळीवर या बाबींचे नियोजन करा.पाणी पुरवठा योजनांच्या प्रलंबीत बिलांबाबत पाणी पुरवठामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना माहिती द्यावी.
थकबाकीचे प्रमाण जास्त असलेल्या अधिकाऱ्यांना हुमने यांनी उभे रहायला लावून त्यांच्याकडून आढावा घेतला. धरणगाव उपविभागातील अधिकाऱ्यांना तर अंत पाहू नका, कामगिरीत सुधारणा झाल्यास बाडबिस्तारा गुंडाळून ठेवा,कारवाईला तयार रहा,असा इशारा त्यांनी दिला. मोठ्या प्रमाणावर थकबाकी असलेल्या जळगाव विभागातील अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचेही त्यांनी आदेश दिले.
काही कर्मचारी काम करीत नाही.त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेत. कारवाई झाल्यानंतर त्यांच्या संघटना आंदोलन करतात. त्या अनुषंगाने त्यांच्या कामाबाबत अहवाल पाठवल्यानंतर त्यांच्यावर वरिष्ठस्तरावरुन कारवाई झाली पाहिजेत,अशी अपेक्षा बैठकीला उपस्थित असलेल्या अभियंत्यांनी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.