आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोरपीसांसाठी होते मोरांची शिकार:सजावटीसाठी वापरू नका मोरपीस अन् थर्माकोल; वन्यजीव संरक्षण संस्थेचे आवाहन

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात सजावटीचे सामान बाजारात विक्रीस आले आहेत. यात मोरपीस व थर्माकॉलचा समावेश असतो. या दोन्ही गोष्टींचा वापर पर्यावरणासाठी हाणीकारक आहे. मोरपीसांसाठी मोरांची शिकार, हत्या केली जाते आहे. त्यामुळे मोरपीसांचा वापर न करता इतर सजावटीच्या वस्तु वापराव्या असे आवाहन वन्यजीव संरक्षण संस्थेने केले आहे.

बाजारात विक्रीसाठी आलेली मोरपिसे बघता ती सर्व पिसे अतिशय चांगल्या स्थितीत असतात. या उलट मोरांचा अधिवास आणि रात्री निवारा असलेल्या ठिकाणी जी नैसर्गिक पिसगळ होते ते पिसे इतक्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत नाहीत. जे नैसर्गिक रित्या गळालेली पिसे असतात ते बहुतेक पीस खराब झालेले असतात. त्या मुळे विक्री साठी आलेले मोरपीस हे प्रामुख्याने मोरांची शिकार करून काढलेले पीस असतात. मोरपीस जरी पक्षानी टाकून दिलेले अवशेष असले तरी कोणत्याही वन्यजीवांचे अवशेष विनापरवाना विकणे गुन्हा ठरतो, असे अवशेष विकणे जवळ बाळगणे भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत ते शिकार कलम या व्याख्येत येतात.

यावर वनविभाग किंवा वन्यजीव प्रेमी पूर्ण पणे नियंत्रण ठेवू शकत नसले, तरी सर्वसामान्य नागरिकांनी जर मोरपीस खरेदीच केले नाहीत तर मागणी कमी होईल. परिणामी विक्री होणार नाही. मोरांची पिसांसाठी होणारी शिकार थांबेल या साठी सर्वच स्तरावर जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरीकांनी मोरपीसांना नकार दिला पाहिजे. असे आवाहन वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, रवींद्र सोनवणे, वासुदेव वाढे आदींनी केले आहे.

जीएसटी भरुन मोरपीसे विक्रीला

गत वर्षी औरंगाबाद शहरात एका व्यक्तीकडून 20 हजार मोरपीसे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले होते. ही पिसे विक्रीसाठी आणताना त्याने उत्तरप्रदेशातील संबधित कंपनीस जीएसटी देखील भरल्याची पावती त्याच्याकडे होते. मोरपीस विक्री करणे बेकायदेशीर असून देखील हा प्रकार समोर आला होता. राष्ट्रीय पक्षाच्या पंख विक्रीला लागलेला जीएसटी पाहून वनविभागाचे पथकही चक्रावले होते तेव्हा हा जीएसटी कुणी व कसा लावला, या पावत्याची सत्यता तपासली जावी अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केली होती.

बातम्या आणखी आहेत...