आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका प्रशासनाचा अॅक्शन प्लान तयार‎:थकबाकी न भरणाऱ्या‎ मिळकतींना दुप्पट दंड

जळगाव‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालमत्ता कराच्या वसुलीसाठी‎ महापालिका अभय शास्ती (दंड‎ माफी) याेजना राबवत आहे. मात्र,‎ तरीही जुनी थकबाकीची रक्कम न‎ भरणाऱ्या मिळकतधारकांना आता १‎ एप्रिलपासून दुप्पट दराने शास्ती‎ लावण्याचे धाेरण राबवण्यात येईल .‎ मनपाच्या इतिहासात प्रथमच‎ शंभर टक्के शास्ती माफीची याेजना‎ राबवली जाते आहे. त्याला‎ सर्वसामान्य नागरिकांकडून चांगला‎ प्रतिसादही लाभताे आहे. मात्र, असे‎ असले तरी काही जुने थकबाकीदार‎ अद्यापही थकबाकी भरत नाही.‎ त्यांच्या मालमत्ता करांची थकबाकी‎ हजाराे आणि लाखाे रुपयांत आहे‎ अशा थकबाकीदारांविरुद्ध‎ महापालिका प्रशासन कठाेर भूमिका‎ घेण्याच्या तयारीत आहे.

वर्षानुवर्षे‎ थकबाकीच्या वसुलीसाठी मालमत्ता‎ जप्ती करणे, लिलाव करणे या‎ संदर्भातला अॅक्शन प्लान तयार‎ करण्यात येताे आहे. १ ते १५ एप्रिल‎ दरम्यान अशा जवळपास सहा‎ हजार मालमत्ताधारकांची यादी‎ तयार करणे, त्यांना आधी पत्र‎ बजावून लिलाव करणे, अनधिकृत‎ मालमत्ता सर्व्हे करून दुप्पट दराने‎ शास्ती लावणे अशी कारवाई हाेईल.‎ मालमत्ता करवसुलीत सुधारणा न‎ झाल्यास पंधराव्या वित्त आयोगाचे‎ अनुदान बंद हाेण्याचा धाेका आहे.‎

बातम्या आणखी आहेत...