आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पादक चिंताग्रस्त:बाजारात टमाट्यांची  आवक दुप्पट; भाव चार रुपये किलाे

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात सर्वच भाज्यांची आवक वाढत असते. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बहुतांश भाजीपाल्याच्या आवकमध्ये माेठी वाढ झाली असून, शनिवारी गेल्या आठवड्याच्या तुलनेत टमाट्यांची आवक दुप्पट झाल्याने भाव घसरून घाऊक बाजारात टमाट्याला चार रुपये किलाे भाव मिळाला. हीच स्थिती फ्लाॅवर, भरताचे वांगे यांचीही हाेती. तर पत्ता काेबीचा दर तीन रुपये किलाे हाेता. उठाव न मिळाल्याने दीड टन माल गाेशाळेत देण्यात आला.

टमाट्याची आवक वाढली आहे. पंधरा दिवसांपूर्वी (३ डिसेंबर) ३२ क्विंटल आवक हाेती. त्यावेळी टमाट्याचे घाऊक बाजारातील दर ३५ ते ४५ रुपये किलाे हाेते. गेल्या शनिवारी आवक ४० क्विंटल हाेती. आता भाव घसरून २५ रुपये किलाे झाले. शनिवारी आवक दुपटीपेक्षा अधिक १०० क्विंटल झाली. त्यामुळे भाव घरून चार रुपये ते ७.५० रुपये किलाे दरम्यान तर सरासरी दर पाच रुपये किलाे हाेते.

असे हाेते भाव व आवक बाजार समितीत शनिवारी भाजीपाल्याचा हाेलसेल भाव व आवक : भरताचे वांगे ४ ते ८ रुपये, सरासरी ६ रुपये किलाे (९० क्विंटल), फ्लाॅवर ४ ते ६ रुपये, सरासरी ५ रुपये किलाे (५३ क्विंटल), पत्ता काेबी ३ ते ६ रुपये, सरासरी ४ रुपये किलाे (३३ क्विंटल), वाटाणे सरासरी २५ रुपये किलाे (८० क्विंटल).

बातम्या आणखी आहेत...