आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:मेहरूण तलावाचे जलप्रदूषण राेखण्यासाठी डीपीआर तयार

जळगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकरा ठिकाणांहून वाहत येणाऱ्या सांडपाण्यापासून हाेणारे मेहरूण तलावाचे जलप्रदूषण राेखण्यासाठी मनपाने केलेले प्रयत्न फसले आहेत. त्यावर कायमस्वरूपी ताेडगा काढण्यासाठी मनपाने दाेन पर्यायांचा विचार केला आहे. यात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी डीपीआर तयार केला आहे. तर दुसरा पर्याय तलावाच्या काठावरून पाइपलाइन टाकण्याचा आहे. या दाेन्ही पर्यायांवर येत्या आठवडाभरात निर्णय हाेणार आहे.

मेहरूण तलावात परिसरातील सांडपाणी वाहून येत असल्याने जलप्रदूषण वाढले आहे. यासंदर्भात मनपाने आॅगस्ट महिन्यात सर्वेक्षण केले हाेते. यात शिरसाेलीराेड व माेहाडीराेड परिसरातील अकरा सर्व्हेमधून सांडपाणी तलावात जात असल्याचे निष्पन्न झाले हाेते. यावर पर्याय म्हणून सांडपाणी जमिनीत जिरवणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे तसेच तलावाच्या काठावर भुयारी गटार उभारण्यावर विचार सुरू केला हाेता. त्यानुसार महापालिका प्रशासन आता दाेन पर्यायांपर्यंत येऊन पाेहाेचल्याने तलावाचे गटार हाेण्याची प्रक्रिया लवकर थांबेल, असे अपेक्षित आहे.

दीड लाख लिटर क्षमतेचा प्रकल्प
मनपाने अहमदाबाद येथील एनजीआेच्या माध्यमातून तलावाच्या परिसरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी डीपीआर तयार केला आहे. मंगळवारी आयुक्त डाॅ. विद्या गायकवाड, नगररचनाचे अधिकारी व निसर्गप्रेमींच्या उपस्थितीत संबंधित संस्थेने डीपीआरचे सादरीकरण केले. यात तलावात वाहून येणारे पाणी एकाच ठिकाणी साठवून त्यावर प्रक्रिया केली जाईल. सुमारे दीड लाख लिटर क्षमतेचा हा प्रकल्प असेल. यासाठी सुमारे चार ते पाच काेटींचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प उभारण्यासाठी निधी उभारावा लागेल.

भविष्याचा विचार करून निर्णय घ्यावा लागणार
तलावात जाणारे सांडपाणी कायमस्वरूपी राेखण्यासाठी ठाेस निर्णय घेतला जाणार आहे. यात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाेबत पाइपलाइनचा पर्याय आहे. मेहरूण तलाव परिसरातील विकास लक्षात घेता भविष्यातील २० ते २५ वर्षांचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी मनपा फंडासाेबतच रहिवाशांकडून तसेच सीएसआर फंडातून निधी खर्च करू. - डाॅ. विद्या गायकवाड, आयुक्त, मनपा.

पाइपलाइनसाठी दाेन काेटी
प्रक्रिया प्रकल्पासाेबतच तलावाच्या चारही बाजूने पाइपलाइन टाकून त्यातून सांडपाणी तलावाच्या सांडव्यापर्यंत वाहून नेण्याचा दुसरा पर्याय आहे. यासाठी २०१८ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी पाइपलाइनचा पर्याय सुचवला हाेता. त्या वेळेला सुमारे दीड काेटींचा खर्च अपेक्षित हाेता. त्यामुळे आजच्या बाजारभावानुसार आता त्याच कामासाठी दाेन ते अडीच काेटींचा खर्च हाेऊ शकताे. यासाठी डीपीसीमधून देखील निधी मिळण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...