आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेसह खान्देश सेंट्रलच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी:डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अवैध वाहनांचा घेरा; प्रवाशांना आत जाण्यात होते असुविधा

जळगाव6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे स्थानक व खान्देश सेंट्रलच्या जागेतील खासगी पार्किंग अशा दोन ठिकाणी पार्किंगची सुविधा सुरू असली तरी डॉ. आंबेडकर पुतळ्यालगत असलेल्या भागात मोठ्याप्रमाणात अवैध पार्किंग केली जात असल्याने प्रवाशांना आत जाण्यास असुविधा होत आहे. मात्र, खासगी पार्किंगच्या मनमानीमुळेच अनेक प्रवासी आपली वाहने डॉ. आंबेडकर पुतळ्यालगत पार्किंग करण्याला प्राधान्य देत आहेत.

मोठ्या प्रमाणात वाहूकत कोंडी

शहरात जळगाव रेल्वे स्थानकातून दररोज साडेसहा हजार प्रवाशांची जा-ये सुरू असते. अनेकजण दररोज अप-डाऊन करणारे तसेच प्रवाशांना सोडायला येणारे प्रवासी येथील रेल्वेच्या व खान्देश सेंटरच्या खासगी पार्किंगच्या जागेत आपली वाहने लावतात. मात्र, पार्किंग करणाऱ्या प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसुलीचा अनुभव प्रवाशांना येत आहे. त्यामुळे प्रवासी अनेकदा आपली वाहने आंबेडकर पुतळ्यालगत लावत असल्याने येथे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

36 तासांपेक्षा कमी वेळेसाठी दुपटीने घेता पैसे

मी नियमित माझे वाहन खान्देश सेंट्रल व रेल्वेच्या पार्किंगमध्ये लावत असतो. मंगळवारी मी खान्देश सेंट्रलच्या पार्किंगच्या जागेत माझे वाहन लावून गेलो. मला परत यायला ३६ तासांपेक्षा कमी कालावधी लागला. त्या वेळी माझ्याकडून येथील ठेकेदाराने 70 रुपये घेतले. ठेकेदाराची प्रवाशांकडून वसुलीची ही मनमानीच आहे.

- जगदीश बैरागी, पार्किंग प्रवासी

मनमानी वसुली केली जात नाही

दुचाकीसाठी 24 तासांचे 35 तर 36 तासांपर्यंत 55 रुपये घेतो. ठरलेल्या पार्किंग रेटनुसारच आम्ही पैसे घेतो. कोणत्याही प्रकारे पार्किंगधारकाकडून अशी मनमानी वसुली केली जात नाही. रेल्वे पार्किंग व आमचे रेट सारखेच आहेत. त्या पद्धतीने रेटबोर्डही आम्ही लावले आहेत. संबंधित पार्किंगधारकाचा तासांबाबत घोळ झाला असेल. कोणत्याही गिऱ्हाइकाकडून अवाजवी वसुली करत नाही.

- विकास सोनवणे, खान्देश सेंट्रल पार्किंग ठेकेदार

असा आहे रेट बोर्ड

रेल्वेस्थानकातील पार्किंग...

सायकल 6 तासांपर्यंत 10 रुपये, 10 तासांसाठी 15 रुपये, 14 तासांसाठी 20 रुपये, 18 तासांपर्यंत 25 रुपये, 22 तासांपर्यंत 30 रुपये, 24 तासांपर्यंत 35 रुपये. तर दर महिन्यासाठी प्रवाशांना 600 रुपये तर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 300 रुपये दर आकारणी करण्यात येते.

खान्देश सेंटरमधील पार्किंग ...

0 ते 12 तासांपर्यंत 20 रुपये, 12 ते 24 तासांसाठी 24 तासांसाठी 35 रुपये दुचाकींसाठी दर आकारणी आहे. तर चारचाकींसाठी 0 ते 3 तासांसाठी 25 रुपये, 3 ते 6 तासांसाठी 50 रुपये, 6 ते 12 तासांसाठी 100 रुपये, तर 12 ते 24 तासांसाठी 200 रुपये दर आकारण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...