आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन:डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याला उजाळा

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिनानिमित्ताने वेशभूषा, वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. शिक्षक-विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी साने गुरुजी, सावित्रीबाई फुले, जोतिराव फुले आदी विभूतींच्या वेशभूषा साकारल्या. शिपायापासून ते शिक्षक व मुख्याध्यापकांची भूमिका विद्यार्थ्यांनी पार पाडली.

पुष्पावती गुळवे विद्यालय : पुष्पावती गुळवे विद्यालयात मुख्याध्यापिका हेमलता पाटील यांनी प्रतिमापूजन केले. डी. आर. माळी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची महती सांगितली. मुख्याध्यापक व शिक्षक झालेले दर्शिता जैन, मयूरी सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.

खडके विद्यालय : ज. सु. खडके विद्यालयात शिक्षक दिनानिमित्ताने एक दिवस शाळेसाठी उपक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी पुष्पा पाटील ह्या होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी मुखाध्यापक संजय पाटील, साधना गाजरे उपस्थित होते.

रत्ना जैन विद्यालय : रत्ना जैन प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापिका आशा साळुंखे यांनी प्रतिमापूजन केले. टी. के. पाटील यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले.
कमल वाणी विद्यामंदिर : कमल वाणी विद्यामंदिर व नवीन माध्यमिक विद्यामंदिरात वंदना नेहेते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षक विभूतींच्या वेशभूषा साकारल्या होत्या. या निमित्ताने वेशभूषा, वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.

माध्यमिक विद्यालय : माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, मुक्ता पाटील यांनी प्रतिमापूजन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून आपल्या सवंगड्यांना शिकवले. गिरीश जाधव व मनोज बावस्कर यांनी मार्गदर्शन केले.

सालार इंग्लिश स्कूल : सालार इंग्लिश स्कूलमध्ये मरीयम उजेर व अरमीना अली या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिकेची भूमिका पार पाडली. या वेळी मुश्ताक सालार, मुख्याध्यापिक आसिफ पठाण उपस्थित होते.

आयडियल इंग्लिश स्कूल : आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये चेअरमन मुश्ताक सालार यांनी मार्गदर्शन केले. शिक्षकांची भूमिका पार पाडणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र देण्यात आले. या वेळी जुबेर अहमद खान आदी उपस्थित होते.

विवेकानंद पूर्व प्राथमिक शाळा : विवेकानंद पूर्व प्राथमिक शाळेत शुभांगी चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच महिला पालकांनी विद्यार्थ्यांना अध्यापन केले. मुख्याध्यापक हेमराज पाटील महिला पालकांशी संवाद साधला. कार्यक्रमासाठी जयश्री वंडोळे यांनी मार्गदर्शन केले.

जी.एच. रायसोनी पब्लिक स्कूल : जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये संचालिका राजुल रायसोनी यांनी प्रतिमापूजन केले. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी भाषणे, नृत्य, नाटक व विविध गीते सादर केली. अमन पांडे व लीना त्रिपाठी यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विद्यार्थिनी ऋतुजा भंडारी व आशिता रायसोनी यांनी केले. या वेळी मुख्याध्यापिका तेजल ओझा व इतर शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.

जय दुर्गा विद्यालय : जय दुर्गा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. ज्योती पाटील व सागर कोल्हे यांनी प्रतिमापूजन केले. मुलांनी शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या भूमिका केल्या.

भगीरथ स्कूल : भगीरथ स्कूलमध्ये विकास इंगळे, उपमुख्याध्यापक साहिल राजपूत, ललिता पाटील हे विद्यार्थी शिक्षक झाले होते. या वेळी के. टी चौधरी, के. पी. पाटील उपस्थित होते.

लाठी विद्यामंदिर : भाऊसाहेब लाठी विद्यामंदिरात कीर्ती चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ललित बडगुजर, मुख्याध्यापिका अंजली बागुल उपस्थित होते.
पलोड पब्लिक स्कूल : येथे समन्वयिका संगीता तळले, स्वाती अहिरराव, अनघा सागडे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रदीप पाटील, मंजूषा भिडे यांनी शिक्षकांवर आधारित कविता सादर केली. हिमांशू आमोदकर, कौस्तुभ सहजे यांनी शिक्षक दिनाविषयी माहिती सांगितली.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय : येथे विद्यार्थ्यांनी शिक्षक साजरा केला. याप्रसंगी प्रा. दीपक झांबरे व प्रा. हेमंत इंगळे उपस्थित होते. सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. कोणिका पाटील, सानिया आणि भविष्य या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले.

मनोज भालेराव यांचा सत्कार : नामदेव नगर पिंप्राळा येथील रहिवासी प्रगती विद्यामंदिर शाळेचे शिक्षक मनोज भालेराव यांचा सत्कार केले. या वेळी विजय गवळे, मनोज पवार, सुजीत पाटील व नागरिक उपस्थित हाेते. सुजीत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नितीन ठाकरे यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित हाेते.

या शाळांमध्ये झाला कार्यक्रम
अभिनव विद्यालय, बहिणाबाई विद्यालय, थीम महाविद्यालय, अध्यापिका विद्यालय, इकरा शाहीन विद्यालय, इकरा खान्देश फाउंडेशन, संस्कृती माध्यमिक विद्यालय, जिजामाता माध्यमिक विद्यालय, श्री छत्रपती संभाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अलफैज उर्दू स्कूल, ज्ञानसाधना विद्यालय, नजीम मलिक उर्दू शाळा, महिला महाविद्यालय, आदर्श सिंधी हायस्कूल, सीताबाई भंगाळे विद्यालय, जे.एस. शिंदे विद्यालय, किलबिल बालक मंदिर, अभिनव शाळा.

बातम्या आणखी आहेत...