आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात स्टिंग ऑपरेशन:औषध निरीक्षकांनी ऑनलाइन गर्भपात औषधी मागवून केला ‘मिशो’चा भंडाफोड, गुन्हा दाखल

जळगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गर्भपाताच्या औषधांची ऑनलाइन बेकायदेशीरपणे विक्री होत असल्याची तक्रार सुहास गाडेकर यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली होती. जळगावच्या औषध प्रशासनाने स्टिंग ऑपरेशन करुन हा प्रकार उघडकीस आणला. औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांनी ऑनलाइन पद्धतीने ‘मिशो’ या शॉपिंग अॅपवरुन गर्भपाताचे किट मागवले. त्यानंतर ‘मिशो’वर रामानंदनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

औषध निरीक्षक मुळे यांनी २९ मार्च २०२२ रोजी मिशो या शॉपींग अॅपवर अनवाँटेड कीट नावाने सर्च करुन गर्भपाताची औषधी मागवल्या. ३ एप्रिल रोजी सकाळी त्यांना घरीच औषधी उपलब्ध झाली. त्यासाठी ४०९ रुपये खर्च त्यांना आला. दरम्यान, या सर्व खर्चाचे बिल मुळे यांनी घेतले होते. औषधी तपासली असता त्यात (Kit of Mifepristone Tablets IP and Misoprostol Tab IP Kit) या नावाची औषधी उपलब्ध झाली. दिल्ली येथील एस. एस. ट्रेडर्स या विक्रेत्याने औषधींची विक्री केली आहे. ही औषधी गर्भपातासाठी वापरत असल्याचे निष्पन्न झाले.

दिल्लीतून झाली ऑनलाइन विक्री गर्भपात कायदा १९७१, सुधारित कायदा २००२-०३,२०२१ मध्ये गर्भपात संदर्भात मार्गदर्शक सूचना आहेत.

गर्भपात कोण करू शकतो?
स्त्रीरोग तज्ञ : एमबीबीएसनंतर पदव्युत्तर शिक्षण घेतलेला तज्ञ (डीजीओ, एमडी, एमएस)
एमबीबीएस : शासनमान्य केंद्राकडून प्रमाणित व विहित प्रशिक्षण पूर्ण केलेला प्रमाणपत्रधारक

गर्भपात कुठे करता येतो?
शासनमान्य गर्भपात केंद्र : पूर्वी या केंद्रांना राज्यस्तरावरून मान्यता मिळायची. आता जिल्हा शल्यचिकित्सक, मनपा आयुक्त यांच्या स्तरावर या केंद्रांना मान्यता देण्यात येते.

गर्भपात कधी करता येतो?
गर्भवतीचा जीव वाचवण्यासाठी, तिच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी, व्यंग असलेले बाळ शारीरिक व मानसिकदृष्ट्या आश्वस्त नसेल, ते स्वतंत्र जीवन जगण्यास असमर्थ असल्यास, बलात्कारामुळे झालेली गर्भधारणा, गर्भनिरोधक औषधे किंवा यंत्र अयशस्वी होऊन नको असलेला गर्भ, अल्पवयीन किंवा अकस्मात वैधव्य, फारकतीसारख्या सामाजिक स्थितीत गर्भपात शक्य.

बातम्या आणखी आहेत...