आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:भीमसिंग मार्केटमधून लाखाेंचा अमली पदार्थांचा साठा जप्त

जळगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अन्न औषध प्रशासन (एफडीए) विभागातर्फे गुरुवारी नवीपेठेतील भीमसिंग मार्केटमधून २ लाख ६२ हजार ३४७ रुपयांचा प्रतिबंधित अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मे. पंकज ट्रेडर्स या दुकानाचे पानमसाला विक्रेता भरत विनायक बाविस्कर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी रामचंद्र भरकड यांच्या तक्रारीनुसार पंकज ट्रेडर्स येथे इलायची सुपारी, करमचंद पान मसाला, जाफरानी दर्जा, नखराली गाेल्ड, रजनीगंधा आदी अमली पदार्थांचा साठा आढळून आला. ताे जप्त करण्यात आला असून, भरत बाविस्कर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पाेटे हे करीत आहे. दरम्यान, अन्न औषध प्रशासन विभागाने केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...