आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव:मद्यधुंद दुचाकीस्वाराने फरफटत नेले; गर्भवतीसह अर्भकाचाही मृत्यू

जळगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाेघा नणंदांसाेबत जाणाऱ्या नऊ महिन्यांच्या गर्भवतीला मद्यधुंद दुचाकीस्वाराने समाेरून जाेरदार धडक देऊन २० फूट फरफटत नेले. त्यात त्या गर्भवतीसह तिच्या पाेटातील अर्भकाचाही बळी गेला. प्रसंगावधान राखून वेळीच बाजूला सरकल्याने दाेन्ही नणंदांचा जीव थाेडक्यात वाचला. जळगाव तालुक्यातील वावडद्यात रविवारी सायंकाळी साडेसात वाजता ही धक्कादायक घटना घडली.

ज्योती दीपक गोपाळ (वय २१, रा. गोपाळवाडा, वावडदा) असे मृत गर्भवती महिलेचे नाव आहे. रविवारी सायंकाळी जेवण झाल्यानंतर ज्योती या वावडदा गावाबाहेर नणंद दीपाली गोपाळ व मीना गोपाळ यांच्यासोबत शौचास जात होत्या. दोन्ही नणंदासमाेर तर पाठीमागे ज्योती या चालत होत्या. त्याच वेळी सुपडू उर्फ नाना विक्रम गोपाळ (२५, रा. वावडदा) हा मद्यधुंद युवक समोरून भरधाव दुचाकी घेऊन आला. दुचाकीस्वाराने ज्याेती यांना जोरदार धडक देऊन २० फूट फरफटत नेले. या अपघातात ज्योती यांच्या पोटावरून दुचाकी गेली. यात त्यांच्यासह पोटातील अर्भकाचाही मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...