आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यावर मोठा परिणाम:बदलत्या हवामानामुळे‎ न्यूमोनियाचा धोका जास्त‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या वातावरणामुळे साथीच्या‎ आजारांमध्ये वाढ झाली आहे तर‎ दुसरीकडे कोरोनामुळे लहान मुलांचे‎ लसीकरणाचेही वेळापत्रक‎ बिघडल्याने बालकांना आरोग्याच्या‎ समस्या भेडसावत आहे. सध्या‎ शहरात गोवरसह न्यूमोनियाच्या‎ रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. खासगी‎ तसेच शासकीय रुग्णालयात‎ न्यूमोनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर‎ उपचार घेत असल्याचे‎ डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.‎

दररोजच्या ओपीडीत सुमारे ३५ ते‎ ४० रुग्ण न्यूमोनियाचे येत आहे.‎ पूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण दुपटीने‎ वाढले आहे. थंडी आणि साथीचे‎ आजार हे समीकरण नवे नसले तरी‎ सध्या वातावरणातील बदलाचा‎ आरोग्यावर मोठा परिणाम झाला‎ आहे, असे डाॅक्टर सांगताहेत.‎

बातम्या आणखी आहेत...