आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Due To Corona And Good Rains, Bull Owners Crowded The Market; From 2014 To 19, The Number Of Bulls In The District Decreased By 28 Thousand| Marathi News

उद्या बैल पोळा:कोरोनाची गच्छंती अन् उत्तम पावसाने बैल मालकांची बाजारात गर्दी वाढली; २०१४ ते १९ पर्यंतच जिल्ह्यात बैलांची संख्या २८ हजारांनी घटली

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा आतापर्यंत तरी झालेला भरपूर पाऊस आणि यंदा कापूस, केळी, सोयाबिन या पिकांना मिळालेली उत्तम किंमत यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्याचा पोळ्यासाठीचा उत्साह वाढला आहे. बैलांना सजवण्यासाठी वापरायच्या साधनांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी शहरातील बाजारांत मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे.दोन वर्षे सण, उत्सवांवर कोरोनाचे सावट होते. यंदा मात्र कोरोनाची भीती राहिलेली नाही. त्यातच कापूस, सोयाबिन, केळी या पिकांना यंदा विक्रमी भाव मिळाळे आहेत. त्यामुळे शेतकरी बऱ्यापैकी समाधानी आहे.

पावसाचे प्रमाणही यंदा जिल्ह्यात चांगले राहिले आहे. त्यामुळे यंदाही पिके चांगली येतील आणि त्यांना भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसू लागला आहे. पोळ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जळगाव शहरातील बाजारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. असे असले तरी जिल्ह्यातील पशूधन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे, ही वस्तुस्थितीही शेतकऱ्यांना अस्वस्थ करते आहे. सन २०१४ ते २०१९ या पाच वर्षोत जिल्ह्यातील बेैलांची संख्या तब्बल २७ हजारांनी कमी झाली आहे. कोरोनामुळे २०१९ नंतर पशूगणना झाली नाही. त्यामुळे सद्यस्थिती कळाली नाही.

बैल पळवणे घातक, काळजी घेणे आवश्यक
यांत्रिकीकरण व आधुनिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी होत आहे. या सणाला बैल पळवण्याची प्रथा घातक आणि चुकीची आहे. बैलांना आणि ते पळवणाऱ्यांनाही इजा होईल, असे काहीही केले जाऊ नये अशी अपेक्षा आहे.
डॉ. एस. व्ही. शिसोदे, पशुसंवर्धन अधिकारी

बातम्या आणखी आहेत...